मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

8 तास झोप होत नाहीये? तर झेलावे लागू शकतात हे 5 नुकसान

निरोगी राहण्यासाठी किमान आठ तासांची झोप आवश्यक आहे, हे तर आपल्याला माहितीच असेल. पण जर आपण किमान आठ तासांची झोप घेत नसाल तर आपल्याला कोणते नुकसान झेलावे लागतील हे तर नक्कीच माहीत नसेल. तर चला कमी झोपण्यामुळे होणार्‍या 5 समस्या जाणून घ्या :-
 
1. आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरात काही सकारात्मक बदल होतात ज्यात आपला विकास, सुधारणा, पेशींचे आराम आणि मानसिक विकास इतर सामील आहे. परंतु पुरेसे झोप होत नसल्यामुळे हे फायदे मिळत नाही.
 
2. पुरेशी झोप न घेणे आपल्या मानसिक क्षमता आणि स्मरणशक्तीसाठी अत्यंत घातक असल्याचे सिद्ध होतं. आपली स्मृती कमी होत जाते, कदाचित आपल्याला विसर पडण्याचा आजार देखील होऊ शकतो.
 
3. ताण आणि मानसिक समस्यांचे शिकार सहसा ते लोक असतात, जे पुरेसे झोपत नाही आणि ज्यांच्या मेंदूला योग्य प्रमाणात विश्रांती मिळत नाही.
 
4. झोप पूर्ण होत नसल्यास शरीर आणि मेंदूला पूर्णपणे विश्रांती मिळत नाही, ज्यामुळे शारीरिक वेदना, क्रॅम्प्स सारख्या समस्या होतात. याव्यतिरिक्त, यामुळे डोके जड होणे तसेच चिडचिड होणे अशा समस्यांना सामोरा जावं लागतं.
 
5. आपल्या कमी झोपण्याच्या सवयींचा खराब प्रभाव आपल्या पचनतंत्रावर देखील पडतो. आपण पुरेशी झोप न घेतल्यास, पचन शक्ती कमजोर होते, ज्यामुळे आपल्याला पोटाच्या समस्या किंवा कब्ज सारख्या समस्या देखील होऊ शकतात.