suvichar

मद्यपानाची सवय सोडण्यासाठी उपाय

Updated: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (16:04 IST)
 
* इच्छाशक्ती या साठी औषध आहे -
जर आपल्याला असे वाटते की एखादे औषध घेतल्यानं आपली मद्यपानाची सवय सुटेल तर असे काही नाही. या साठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. ते आपल्याला सल्ला देखील देतील.जेणे करून आपली मद्यपानाची लागण कमी होईल. पण या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपली इच्छाशक्ती दृढ करण्याची आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते.
 
* योजना आखावी -
तज्ज्ञांच्या मते, 'मला मद्यपान सोडवायचे आहे' असे म्हणून आपली मद्यपानाची सवय सुटणार नाही. या साठी आपल्याला एक योजना आखावी लागेल की आपल्याला मद्यपानाची इच्छा झाली असल्यास त्यावेळी आपल्याला काय करावयाचे आहे आणि आपल्या मनावर कसा ताबा ठेवायचा आहे किंवा आपण आपल्या मित्राशी बोलू शकता. अशा गोष्टी स्पष्ट झाल्यावर आयुष्य जगणं थोडं सोपं होईल.

* स्वतःची काळजी घ्या -
मद्यपानाचे व्यसनापासून मुक्त होणे फार सोपे नाही. या साठीचे प्रयत्न करताना आपण कधी आनंदी असाल तर कधी अस्वस्थ असाल. म्हणून पुढील परिस्थिती साठी स्वतःला मानसिकदृष्टया सज्ज ठेवा आणि मनाला शांत राखण्यासाठी काही काम करा जसे की वॉकला जाणे, ध्यान करणे किंवा झोपण्यापूर्वी दिवसभराच्या चांगल्या गोष्टींना आठवणे. या मुळे आपण सकारात्मक अनुभवाल.
 
* इतर गोष्टींवर लक्ष द्या -
 आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मद्यपानाची सवयी पासून मुक्त होण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवणे फार महत्त्वाचे आहे. या साठी आपण एखादा छंद वर्ग जसे की डान्स, संगीत, पेंटिंग देखील सुरू करू शकता. मद्यपान करण्याऐवजी आपण इतर काम देखील करू शकता. त्याची एक यादी तयार करा आणि त्यामधील काही निवडक काम करा.
 
* स्वतःला आठवण करत राहा - 
तज्ज्ञांच्या मते मद्यपान प्रत्येकाच्या आरोग्यासाठी चांगले नाही, पण आपल्याला मद्यपान का सोडायचे आहे त्यासाठी एक यादी बनवा जसं की एक चांगले पालक बनण्यासाठी किंवा एक मदतगार जोडीदार बनण्यासाठी किंवा नोकरीत आपली कामगिरी सुधारण्यासाठी. हेतू कोणतेही असो दररोज स्वतःला या गोष्टींची आठवण देत राहा, जेणे करून आपण मद्यपान सोडण्यासाठी प्रेरित व्हाल.

* हार मानू नका - 
मद्यपानाची जुनी सवय इतक्या लवकर बदलत नाही. म्हणून ही सवय बदलण्यासाठीची कोणती ही युक्ती कामी न आल्यामुळे एखाद्या दुसऱ्या युक्तीला अवलंबवा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या, पण हार मानू नका.
 
मद्यपानामुळे आरोग्याचे नुकसान होते - तज्ज्ञांच्या मते, मद्यपानाचे अधिक सेवन केल्यानं आरोग्यास हानी होऊ शकते. 

* शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. या मुळे मज्जासंस्था, लिव्हर आणि पोटाच्या आजारांचा धोका वाढू शकतो.
 
* हृदय विकारांची शक्यता वाढते.
 
* आरोग्यासह कुटुंबातील आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांशी संबंध बिघडतात, कारण नशा करताना एखादी व्यक्ती काय बोलते ते त्याला स्वतःलाच कळत नाही. 
 
* मद्यामध्ये इथाईल अल्कोहोल वापरले जाते. हे मानवी रक्तात सहज विरघळते. याच कारणास्तव दीर्घकाळापर्यंत मद्यपानाचे सेवन केल्याने शरीराच्या जवळ-जवळ सर्व अवयवांवर परिणाम होतो. वारंवार सेवन केल्याने लिव्हर सिरोसिस होऊ शकते. इथाईल अल्कोहोल मुळे पचन संस्था देखील खराब होऊ शकते.
  

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

पावसाळ्यात तुमच्या हेल्मेटला दुर्गंधी येत असेल तर, हे सोपे उपाय करून पहा

जातक कथा : ढोलवादक आणि जंगलातील दरोडेखोर

आषाढ महिन्यात 'आखाड तळणे' म्हणजे काय? वैज्ञानिक आणि आरोग्यदायी कारण जाणून घ्या

पावसाळ्यात या ५ भाज्या खरेदी करणे टाळा, आरोग्याच्या समस्या टाळा

'सुरळीची वडी' चविष्ट आणि पौष्टिक दोन्ही; या महाराष्ट्रीयन पदार्थाची पाककृती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments