ग्रीन टी पेक्षा फायदेशीर आहे ब्लू टी 5 फायदे जाणून घ्या
आपल्याला ग्रीन टी आणि ब्लॅक टी बद्दल माहित आहे आणि आपण त्याचे सेवन देखील केले असेल, परंतु आपण कधीही निळा चहा म्हणजे ब्लू टी प्यायला आहे का? जर आपण प्यायला नाही तर एकदा नक्की प्रयत्न करा कारण हा निळा चहा आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की चहा निळा कसा? तर आम्ही सांगू इच्छितो की हा चहा अपराजिताच्या सुंदर निळ्या फुलांना उकळवून बनवतात.म्हणून हा निळा रंगाचा असतो. याला बटरफ्लाय टी देखील म्हणतात. याला बनविण्याची कृती आणि 5 आश्चर्यकारक फायदे देखील आहे. चला जाणून घ्या.
कृती - हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला अपराजिताची निळे फुले, पाणी आणि मीठ, साखर किंवा लिंबू चवीप्रमाणे लागतील. प्रथम पाणी उकळवा आणि त्यात अपराजिताची फुले घाला. त्याचा रंग निळा झाल्यावर मीठ किंवा साखर घालून काही थेंब लिंबाचा रस घाला आणि गाळण्याने गाळून घ्या. आता हा चहा पिण्यास तयार आहे. आता त्याचे फायदे जाणून घ्या -
1 डिटॉक्स टी - आपल्या शरीरातून अवांछित घटक काढून टाकून हा चहा शरीराला डिटॉक्स करतो आणि शरीराची अंतर्गत स्वच्छ करतो.
2 रोग प्रतिकारशक्ती बूस्टर - रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून कार्य करतो आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवून रोगांपासून आपले संरक्षण करतो.
3 मधुमेह - मधुमेहाच्या रूग्णांसाठी हा निळा चहा खूप फायदेशीर आहे. साखरेची पातळी राखण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.
4 सौंदर्य लाभ - आपण सौंदर्याला वाढवू इच्छित असल्यास, निळा चहा एक चांगला पर्याय आहे. हा चेहऱ्यावरील डाग,आणि फ्रेकल्स नाहीसे करून रंग सुधारण्यास मदत करतो.
5 मायग्रेन - सकाळी या चहाचे सेवन केल्याने मायग्रेनच्या रुग्णांना फायदा होतो. वेदना व्यतिरिक्त मानसिक थकवा देखील दूर करतो.