अशी नाना रूपे आहेत बरं चहाची...
मस्त गवती चहा घातलेला चहा,
वाफाळलेला आलं घातलेला अहाहा,
विलायची चा मंद सुगंध दरवळणारा,
लवंगी चा तिखटपणा रेंगाळणारा,
कलमी घालून खमंग, घोट घोटभर,
किर्रर्र गोड करून पिणार दिवसभर,
काळा न दूध घालतेला, तब्येतीस उत्तम,
तुळस घालून केला त्यास,अत्युत्तम,
मसाला घालून केलं त्यास मसालेदार,
निव्वळ दुधाचाच केला की लागतो फक्कड फार,
अशी नाना रूपे आहेत बरं चहाची,
घ्याल प्रेमानं, द्याल प्रेमानं तेव्हांच लज्जत वाढेल ह्याची!!
.....अश्विनी थत्ते