National Technology Day: 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी खास संबंध
11 मे रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. 11 मे 1998 पासून या दिनाची सुरुवात झाली होती आणि या दिवसाचं भारतीय इतिहासात वेगळंच स्थानआहे. 22 वर्षांपूर्वी 11 मे रोजी राजस्थानच्या पोखरणमध्ये भारताने यशस्वी अणुचाचणी केली होती. अणू चाचण्यांमुळे जगाच्या नकाशामध्ये भारताला वेगळे स्थान मिळाले होते. जेव्हा जेव्हा 11 मेचा उल्लेख केला जाईल तेव्हा पोखरण अणू चाचणीचा नेहमीच उल्लेख केला जाईल. आणि त्यांच्या बरोबर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही स्मरण होईल.
भारताने पाच यशस्वी अणु चाचण्या केल्या
11 मे 1998 रोजी पोखरण न्यूक्लियर टेस्ट रेंज मध्ये सेनेने पाच अणू बॉम्बचे यशस्वी परीक्षण केले होते. जोधपुरमील पोखरणमध्ये भारतीय सेनेने ऑपरेशन शक्ति-1 परमाणु मिसाइल ला यशस्वीपणे फायर केले होते आणि हे पोखरणमध्ये पाच परमाणु टेस्ट्सपैकी पहिले होते. पोखरण येथील अणु चाचण्यांना भारताने ऑपरेशन शक्ती कोडनेम असे नाव दिले. शक्ति मिसाइलच्या यशस्वी टेस्टमुळे देखील 11 मे ला टॅक्नोलॉजी डे म्हणून स्मरण केलं जातं. पोखरण परमाणु परीक्षणाला 'मिसाइलमॅन' म्हणून ओळख असणार्या माजी राष्ट्राध्यक्ष डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी लीड केलं होतं.
भारत न्युक्लियर पॉवर्ड देश बनला
या चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला अणु शक्ती संपन्न देश म्हणून घोषित केले. या यशस्वी चाचण्यांनंतर जगातील अणु क्लब देशांमध्ये सामील होणारा भारत सहावा देश ठरला. ही भारताची दुसरी भारतीय अणुचाचणी होती. पहिले परीक्षण मे 1974 मध्ये केले गेले होते. 11 आणि 13 मे 1998 रोजी राजस्थानच्या पोरखरण परमाणु स्थळावर पाच परमाणु परीक्षण केले गेले होते. या अणू परीक्षणानंतर जपान आणि अमेरिकेसह प्रमुख देशांनी भारताविरूद्ध विविध प्रकारचे निर्बंध लादले.
अमेरिकासह संपूर्ण जग होतं हैराण
भारताने संपूर्ण जगाला आपल्या शक्तीचे परिचय दिले. या चाचण्यांनंतर अमेरिकेसारख्या देशांनाही आश्चर्य वाटले की अखेर भारताने आपली गुप्तचर संस्था सीआयएच्या सैटलाइट्स कशी चकमा दिली. ललित मान सिंह हे त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव होते. 11 मे 1998 ला दुपारी 15.45 वाजता भारताने पोखरण रेंजमध्ये तीन अंडरग्राउड न्यूक्लियर टेस्ट्स केले. नंतर 13 मे रोजी देखील भारताने दोन न्यूक्लियर टेस्ट्स केले.
याच दिवशी हंस आणि त्रिशूल क्षेपणास्त्रांची चाचणी
पोखरण परीक्षण रेंजवर पाच टेस्ट्स सोबतच भारत अणुऊर्जा असलेला असा पहिला देश बनला, ज्याने परमाणु अप्रसार संधि (सीटीबीटी) वर हस्ताक्षण केले नव्हते. 11 मे रोजी भारताचे स्वदेशी एयरक्राफ्ट हंस ने पहली उड्डाण भरली होती. हंस-1 ला नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेट्रीजकडून डेव्हलप केले होते. 11 मे 1998 रोजी डिफेंस रिसर्च एंड डेव्हलपमेंट ऑर्गनाइजेशन (डीआरडीओ) द्वारे त्रिशूल क्षेपणास्त्राची शेवटची चाचणी घेण्यात आली.