रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Health Benefit Of Pista : पिस्ता खाण्याचे फायदे जाणून घेऊ या....

मिठाईंना सुशोभित करणारा सुखा मेवा पिस्ता, अनेकांच्या आवडीच्या पदार्थामध्ये समाविष्ट आहेत. चवीला तर हे अद्वितीय तर आहेच, याचे फायदे जाणून घेतल्यावर तर आपल्यास हे अजून आवडू लागेल. जाणून घेऊ या पिस्ता खाण्याचे फायदे....
 
1 चटक हिरव्या रंगाच्या असणाऱ्या पिस्त्यामध्ये, फायबर, प्रथिन, व्हिटॅमिन सी, जिंक,कॉपर, पोटॅशियम, आयरन, कॅल्शियम आणि बरेचशे  पोषक घटक भरपूर असतात. हे निव्वळ आपल्याला निरोगीच ठेवत नाही तर आजारांना देखील आपल्यापासून लांब ठेवतं.
 
2 ह्या मध्ये असणारे आवश्यक असलेले फॅटी एसिड आपल्या त्वचेमध्ये स्निग्धता बनवून ठेवत, ज्यामुळे नैसर्गिक चकाकी बनून राहते. या व्यतिरिक्त शरीरातील अवयवांमध्ये देखील स्निग्धते साठी फायदेशीर असतं .
 
3 पिस्त्यामध्ये भरपूर मात्रांमध्ये अँटी ऑक्सीडेन्ट आढळतं, जे आपल्याला तरुण ठेवण्या व्यतिरिक्त आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. हे त्वचेच्या सुरकुत्यांना कमी करतं.
 
4 केसांना गळण्यापासून वाचविण्यासाठी पिस्ता फायदेशीर आहे. आपण इच्छित असल्यास ह्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता, किंवा ह्याची पेस्ट बनवून आपल्या केसांना लावू शकता. 
 
5 उन्हाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पिस्त्याचा वापर करणे फायदेशीर आहे. ह्याला चारोळीसह दुधामध्ये वाटून ह्याची पेस्ट बनवून पॅक प्रमाणे लावा. नियमाने हे केल्याने त्वचेचा रंग फिकट होऊ लागेल. 
 
6 पिस्त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे कोणाही माणसाचं पोट बऱ्याच काळ भरलेलं वाटण्यासाठी पुरेसं असतं. म्हणून ह्याचा सेवनाने वजनाला नियंत्रित ठेवता येतं.
 
7 पिस्ता खाल्ल्याने हृदयाशी निगडित आजार होत नाही, कारण पिस्त्यामध्ये फॅटी एसिड आढळतं, जे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतं.