गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

शेवगाच्या शेंगा एक अमृत... सर्व आजारांवर उपयोगी

drumstick
शेवगाच्या शेंगांचे आपल्या आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. शेवगाच्या शेगत 300 हून अधिक प्रकारांच्या आजाराचे औषध आहे. दक्षिण भारतात तर ह्याचा वापर दररोजच्या आहारात केला जातो. शेवग्याचा शेंगांमध्ये कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, आयरन, मॅग्निशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळतात.  
 
शेवगाच्या शेंगांची कोळी पानं आणि फळे भाजी म्हणून वापरतात. ह्याचा काड्या, हिरवे पानं त्याच बरोबर ह्याचे सुकलेले पान पण औषधीयुक्त असतात. ह्याचा पानाची भाजी खूप चवदार असते. जेवणात ह्याचे सेवन करावे. चला तर मग याचे गुणकारी लाभ जाणून घेऊ या..
 
* पोटाशी निगडित कुठल्याही समस्या अपचन असो किंवा बद्धकोष्ठता असल्यास शेवगाच्या शेंगांचे रस प्या किंवा ह्याची भाजी करून खाल्ल्याने पोटाच्या समस्या नाहीश्या होतात.
* नेत्र विकार असल्यास शेवग्याच्या शेंगा, पान, फुले जास्त प्रमाणात वापरावी. दृष्टी कमी झाल्यास लाभ मिळतो.
* सायटिका, संधिवात सारखे त्रास असल्यास याचा पानांचा आणि ह्याच्या झाडाच्या सालांचा काढा करून प्यायल्याने हे रोग नाहीसे होतात.
* यकृतास निरोगी ठेवण्यास ह्याची भाजी बनवून खाल्ल्यास हे प्रभावी असतात.
* शरीरातील कुठल्याही भागात लचक भरलेली असल्यास ह्याची पाने बारीक वाटून घ्यावी आणि त्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळून लावल्याने वेदना आणि सूज कमी होते.
* कान दुखण्यावरही हे प्रभावी आहे. ह्याचा पानाचा रस काढून कानात थेंब टाकल्याने कानदुखीच्या वेदना पासून आराम मिळतो.
* मूत्रपिंडाच्या किंवा किडनीच्या स्टोन झाल्यास शेवगाच्या शेंगांची भाजी किंवा सूप करून प्यायलाने स्टोन निघून जातो
* रक्तदाब, हृदयरोगावर फायदेशीर आहे. शरीरातील रक्तदाब आणि कॉलेस्ट्राल कमी करते. वजन वाढल्यास वजन कमी करते. ह्यात कॅल्शियम भरपूर असतात त्यामुळे हाडं बळकट होतात.
* लहान मुलांना जंत होण्याची समस्या जास्त असते. असे झाल्यास ह्यांचा पानांचा रस द्यावा आराम होतो.
* अतिसार झाल्यास देखील पानांचा रस देणे लाभकारी असतं.
* शेवगाच्या शेंगा ब्लड प्युरिफायर म्हणून काम करते. ह्याचे सूप किंवा भाजी बनवून खाल्ल्यास कँसर सारख्या आजारामध्ये पण लाभकारी आहे.
बघा ह्या शेवगाच्या शेंगा किती गुणकारी आणि प्रभावी आहे. त्याचे पानं, फुल, झाडाची सालं सगळंच काही औषधी असतं मग आता आपण ह्याचा आपल्या आहारात समावेश करू या आणि शरीरास निरोगी ठेवू या.