1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 27 एप्रिल 2023 (23:06 IST)

Watermelon benefits शरीरासाठी फायदेशीर कलिंगड

Watermelon beneficial for the body
कलिंगड सर्वांना आवडणारे फळ आहे. हे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे. या मध्ये पाणी मुबलक प्रमाणात आढळते. हे उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे.अनेक रोगांशी लढण्यात देखील हे प्रभावी आहे. या मध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ए, बी, सी, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम,पोटॅशियम आणि फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळते. चला याचे फायदे जाणून घेऊ या.
 
1 उच्च रक्तदाब मध्ये फायदेशीर- जर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर आपल्याला कलिंगडाचे सेवन आवर्जून करावे.  
 
2 वजन कमी करतो- कलिंगड वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले आहे. या मध्ये सिट्रालीन घटक आहे जे वजन कमी करण्यात मदत करतो. हे शरीरावरील चरबी कमी करण्यात मदत करतो. कलिंगड खाल्ल्याने पोट भरलेले वाटते. आपण जास्ती खात नाही आणि वजन वाढत नाही. 
 
3 डिहायड्रेशन होऊ देत नाही- कलिंगडात 90 टक्के पाणी असते,हे शरीरातील द्रव पदार्थांची कमतरता दूर करतो. डिहायड्रेशन पासून वाचवतो. 
 
4 हृदयाला निरोगी ठेवतो - कलिंगडात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. कलिंगड खाल्ल्याने हृदयाचेआरोग्य सुधरते.