गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

आरोग्य टिप्स- निरोगी राहण्यासाठी या टिप्स अवलंबवा

निरोगी राहणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. असं म्हणतात की निरोगी शरीरात सर्व सुखांचा वास असतो. आणि निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणं, योग्य आहार आणि  स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. परंतु आपण आपल्या सध्याच्या व्यस्त जीवनात हे सर्व काही करू शकत नाही. वेळेच्या अभावी योगा करू शकत नाही व्यायाम करू शकत नाही. जर आपण देखील इतके व्यस्त आहात तर काळजी नसावी. आम्ही सांगत आहोत काही अशे टिप्स जे आपल्याला निरोगी ठेवण्यात मदत करतील. 
 
* दिवसातून दोन वेळा एक चमचा मध पाण्यात मिसळून प्यायल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहत.
 
* एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून सकाळी अनोश्यापोटी प्यायल्यानं डोळ्याची दृष्टी चांगली होते.
 
* उन्हात जळालेली त्वचेवर चमक आणण्यासाठी नारळपाणी,कच्चं दूध, काकडी आणि लिंबाचा रस आणि चंदन पावडर मिसळून अंघोळीच्या पूर्वी शरीरावर लावा.
 
* आपल्या नखांवर दररोज ऑलिव्ह तेल लावून हळुवार हाताने मसाज करा. असं केल्यानं आपले हात स्वच्छ आणि सुंदर दिसतील.
 
* पिकलेली केळी मॅश करून चेहऱ्यावर लावून अर्धा तासानंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. 
 
* कांजिण्या  किंवा उकळणेचे डाग काढण्यासाठी 2 बदाम भुकटी,2 चमचे दूध आणि 1 चमचा संत्र्याच्या सालाची पेस्ट मिसळून लावा.
 
* ओठ गुलाबी ठेवण्यासाठी दररोज बीटाचा रस ओठांवर लावा आणि अर्ध्या तासाने ओठ थंड पाण्याने स्वच्छ करून घ्या.
 
* रुक्ष केसांसाठी सौम्य आणि अतिरिक्त प्रथिन असलेले शॅम्पू वापरावे.
 
* केसांची गळती थांबविण्यासाठी आणि केस घनदाट बनविण्यासाठी कडुलिंबाचे तेल वापरावे.
 
* अंघोळ करताना चांगले अँटी बेक्टेरियल साबणाचा वापर करावा.
 
* ओले असलेले केसात कधीही कंगवा करू नका आणि केसांचा गुंता सोडविण्यासाठी जाड दात असलेला कंगवा वापरा.
 
* बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन क्रीम आवर्जून लावा. कडुलिंबाच्या पॅक मध्ये गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावा.सुकल्यानंतर धुऊन घ्या.