शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जर दु:ख विसरण्यासाठी दारू पीत असाल तर मोठी चूक करत आहात, कारण जाणून घ्या

आजकाल चिंता, तणाव आणि नैराश्य खूप सामान्य झाले आहे. या सर्व गोष्टी तुमच्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करत नाहीत तर तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीही हानिकारक आहेत. अनेकदा लोकांना चिंता किंवा तणाव दूर करण्यासाठी काहीतरी खाणे किंवा पिणे आवडते. त्यांना वाटते की या पदार्थांमुळे तणाव कमी होईल आणि ते आनंदी होतील, पण इथेच त्यांची मोठी चूक होते. कारण असे अनेक पदार्थ आहेत जे तणाव आणि नैराश्य कमी करतात, परंतु प्रत्यक्षात ते समस्या वाढवतात. अशा परिस्थितीत त्यांचे सेवन टाळावे. चला जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ.
 
ज्यूस तुम्ही विचार करता तितके हेल्दी नसतात- फळांचा रस सामान्यतः अतिशय आरोग्यदायी मानला जातो. पण प्रत्यक्षात ते तुम्ही विचार करता तितके निरोगी नाहीत. जेव्हा तुम्ही फळे खातात तेव्हा त्यातून तुम्हाला भरपूर फायबर मिळते. यामुळे तुमचे पोट भरते आणि तुम्हाला ऊर्जा मिळते. पण जेव्हा तुम्ही फळांचा रस पितात तेव्हा तुम्हाला फक्त पौष्टिक, गोड आणि पाणी मिळते. जर तुम्ही पॅकेज केलेला ज्यूस पीत असाल तर त्यात साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुमचा मूड बदलतो. तुम्हाला अचानक राग येऊ शकतो किंवा कमी वाटू शकतो. अशा परिस्थितीत फळांचे रस तुमची चिंता आणि नैराश्य दूर करू शकत नाहीत.
 
सोडा हा समस्येवरचा उपाय नाही- सोडा हे आजकाल लोकांचे आवडते पेय आहे. त्याशिवाय पार्टी, आऊटिंग, पिकनिक अपूर्ण मानले जाते. अनेकदा लोकांना थकवा दूर करण्यासाठी, मूड फ्रेश करण्यासाठी किंवा दुःख दूर करण्यासाठी सोडा प्यायला आवडते. पण तुमचा विचार चुकीचा आहे. सोडा पेये तुमचे नैराश्य वाढवू शकतात. यामध्ये जास्त प्रमाणात साखर आणि प्रिजर्वेटिव्ह असतात, ज्यामुळे तुमचा तणाव आणि नैराश्य निर्माण होते. त्यांच्यामध्ये कोणतेही पोषक तत्व नाहीत.
 
कॉफीमुळे तणाव कमी होत नाही - भारी टेन्शन आलंय यार, चल कॉफी घेऊ असं म्हणणारे लोकं तुम्ही अनेकदा बघितले असतील. कॉफी तुमचा तणाव आणि नैराश्य दूर करत नाही, उलट तुमची चिडचिड वाढवते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे, तुमची झोप कमी होऊ शकते, ज्यामुळे तुमचे नैराश्य आणि तणाव दोन्ही वाढते. शक्य असल्यास डिकॅफिनेटेड कॉफीचे सेवन करा.
 
दारूमुळे तणाव कमी होणार नाही- तणाव आणि नैराश्य दूर करण्यासाठी लोक अनेकदा दारूचे सेवन करतात. लोकांचा असा विश्वास आहे की अल्कोहोल सेवन केल्याने त्यांचा ताण कमी होतो, पण तसे अजिबात नाही. मद्यपानामुळे तुमची झोप व्यत्यय येऊ शकते. अपुऱ्या झोपेमुळे तुमचा तणाव आणि नैराश्य या दोन्हींना चालना मिळते. अशा परिस्थितीत तुमच्या दोन्ही समस्या वाढू शकतात.
 
फास्टफूड खाल्ल्याने चिंता वाढेल- काही लोक तणाव आणि दुःख दूर करण्यासाठी खाण्याचा सहारा घेतात. ते काहीतरी मसालेदार खाऊन त्यांचा मूड सुधारण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही टोमॅटो केचप किंवा सोया सॉसने बनवलेले पदार्थ खाऊन हे करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही इथे चुकीचे आहात. वास्तविक टोमॅटो केचपमध्ये भरपूर कृत्रिम गोडवा मिसळला जातो. हा गोडवा तुमची चिंता आणि नैराश्य वाढवू शकतो. त्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करा. त्याचबरोबर नूडल्स, चाऊ में, मोमोजमध्ये वापरण्यात येणारा सोया सॉस तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.