Health Tips : भेंडी करेल वजन कमी
बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल. पाहू किती गुणकारी आहे भेंडी:
* वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.
* मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.
* भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.
* भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.