1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Health Tips : डाळिंबाच्या सालीचे फायदे जाणून घ्या

एका डाळिंबात खूप साऱ्या रोगांवर उपाय लपलेला आहे. असंख्य गुणांनी भरपूर या फळाच्या दाण्यांमध्ये जेवढा गोड पणा आहे तसेच याचे साल देखील उपयोगी असते. आपण ज्याचे काम नाही म्हणून त्याला टाकून देतो. तेच खर उपयोगी आहे डाळिंबाच्या सालीची उपचारात्मक विशेषता म्हणजे हे अनेक रोगांवर उपचार प्रदान करते. यातील अँटीफंगल आणि अँटीवायरल गुणधर्मामुळे हे एक औषधाच्या रूपात काम करते. डाळिंबाचे साल अँटीऑक्सीडेंट ने समृद्ध  असते. आणि त्वचे चे आजार बरे करायला  मदत करते तसेच खोकला, गळ्यातील खवखव याला आराम देण्यात मदत करते. 
 
डाळिंबाच्या सालीचे फायदे-  
१. डाळिंबाच्या सालांमध्ये अँटीबैक्टीरियल, अँटीवायरल, अँटीइंफ्लेमेटरी गुण आढळतात. हे त्वचा रोग, मुरुम , खाज यांवर उपयोगी आहे. डाळिंबाचे साल हे अनेक रोगांवर गुणकारी आहे. 
२. त्वचेचे वय व सुरकुत्या दूर करायला मदत करते. एवढेच नाही तर हे नैसर्गिक मॉइस्चराइजर आणि सनस्क्रीनच्या रूपात कार्य करते. 
३. डाळिंबाच्या सालात जास्त प्रमाणात विटामिन सी असते. जे आपल्या पूर्ण शारीरिक विकासासाठी एक महत्वपूर्ण तत्व आहे. 
४. डाळिंबाच्या सालात मोठया प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. जे एलडीएल कोलेस्ट्रॉला ऑक्सीडेशन पासून वाचवतो. हे पण सांगितले जाते की यातील पोषक्तत्वे हे हॄदयाच्या समस्या येण्यापासून रोखतात. 
५. डाळिंबाचे साल अँटीबेक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणांनी समृद्ध असतात. जे तोंडातील हिरडयांच्या सुजेला, दाताचे तूटने आणि तोंडातील छाले यांवर उपयोगी आहे. 
६. डाळिंबाचे साल मानवी हाडांमधील घनत्वचे नुक़सान थांबतात.