सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 11 एप्रिल 2019 (11:06 IST)

लठ्ठपणा, कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी रोज नाश्त्यात करा पपईचे सेवन

कोणत्याही ऋतुमध्ये आरोग्याबद्दल सजग राहणे फारच गरजेचे आहे. या कामात पपई बर्‍याच पातळीवर आमची मदत करते. पपईचे गुण आणि त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
 
पपई एक खास फळ आहे. याचे सेवन केल्याने केवळ रक्तच शुद्ध होत नाही तर पोट, त्वचा आणि केसांसाठी देखील पपई वरदान सिद्ध होते.
 
पपई खाण्याचे फायदे
पपई व्हिटॅमिन सी ने भरपूर आहे. पिकलेल्या पपईत आढळणारे एंटी-ऑक्सिडेंट आणि फायबर शरीरात कोलेस्टरॉल आणि रक्ताचे थक्के निर्मिती रोखण्यास मदत करतात. बर्‍याचवेळा कोलेस्टरॉल हे हृदयघात आणि रक्तचाप वाढणे व हृदयाशी निगडित बर्‍याच आजारांचे कारण बनतं.
 
रोजच्या खाण्यात पपईचा वापर तुम्हाला फायदा पोहोचवले. यात फार कमी कॅलरी असते जे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. यात फायबरची मात्रा जास्त असल्यामुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम राहत.
 
शुगरच्या रुग्णांसाठी पपई एक विकल्प आहे. चवीत गोड असली तरी यात शुगरचे प्रमाण फारच कमी असते.
 
पपईत आढळणारे व्हिटॅमिन अ ची मात्रा डोळ्यांच्या दृष्टीसाठी योग्य पर्याय आहे. यात उपस्थित व्हिटॅमिन सी हाडांसाठी चांगले असतात. हे आर्थराइटिस सारख्या गंभीर आजारांपासून आपला बचाव करते.
 
पपईचे जास्त सेवन देखील नुकसानकारक असत
पपईचे जास्त सेवन केल्याने किडनीत मूतखडा होण्याचा धोका वाढतो. व्हिटॅमिन सी ची जास्त मात्रा असल्याने श्वासाशी निगडित त्रास वाढण्याचा धोका वाढतो. याचे अधिक सेवन केल्याने अस्थमा आणि कावीळ आजार होण्याची शक्यता वाढते. गर्भावस्थांमध्ये चुकून ही पपईचे सेवन करु नये कारण यामुळे गर्भपात होण्याची शंका वाढून जाते.
 
या वेळेस पपईचे सेवन करू नये
पपईचे सेवन सकाळी 5 ते 9 पर्यंत या दरम्यान करावे. एका वेळेस एक वाटी पपई आरोग्यासाठी पुरेसे आहे. संध्याकाळी 6 वाजेनंतर पपईचे सेवन पोटासाठी नुकसानदायक ठरतं. सकाळच्या न्याहारीत पपईचे सेवन करावे. 
 
डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर
कच्च्या पपई महिलांमध्ये ऑक्सीटोसीनची मात्रा वाढवू शकते. हे गर्भाशयात संकुचन आणते आणि मासिक पाळीच्या वेळेस दुखणे कमी करते. ज्यांना शुगरचा त्रास असतो त्यांनी कच्च्या पपईचे सेवन करून रक्तातील शर्कराचे प्रमाण कमी करावे. यामुळे शरीरात इंसुलिनचे प्रमाण वाढतं. कच्च्या पपईत फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. पपई पोटाशी निगडित समस्या दूर करते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढते.
 
याच्या पानांचा रस वरदान आहे
चवीला कडवट पपईचे पान शरीराला सर्व रोगांपासून लढण्याची शक्ती प्रदान करंत. यात व्हिटॅमिन ए, सी, डी, इ आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळतं.