मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (15:41 IST)

Belly Fat लटकत्या पोटावरील चरबी गायब करण्यासाठी हे करा

हल्ली सतत बसत राहिल्यामुळे महिलांचा लठ्ठपणा वाढत आहे आणि पोटाजवळीक चरबी देखील वाढत आहे. कमी वयात देखील महिलांचे पोट बाहेर आलेले दिसत आणि म्हणूनच गरज आहे वेळेवर योग्य आहार घेण्याची आणि स्वत:कडे लक्ष देण्याची. तसेच नियमाने वर्कआउट करणे देखील आवश्यक आहे. असे काही व्यायाम आहेत ज्याने काही दिवसातच आपल्याला फिट वाटू लागेल.
 
Scissor Planks
आपण आपल्या रुटीनमध्ये कातरी व्यायाम करु शकता. याने कंबरेवरील चरबी कमी  होईल आणि फिगरही मेंटेन राहील. याने आपल्याला आरोग्याचे लाभ ही मिळतील. जसे आपल्याला मांडीची चरबी कमी होइल आणि शरीराचे हॅमस्ट्रिंग्स देखील चांगले राहतील. कसे कराल-
यासाठी सर्वात आधी पाठीवर झोपा. नंतर दोन्ही पाय सरळ करा आणि दोन्ही हात सरळ करा. नंतर आपले खांदे फरशीवरुन 4 इंचपर्यंत उचला. मग पाय कातरीप्रमाणे वर-खाली करा आणि ही प्रक्रिया 10 वेळा करा.
 
Boat Pose
आपल्या पोटावरी चरबी कमी करण्यासाठी आपण सोपे वर्कआउट करु शकता. आपण व्यायाम सकाळी किंवा संध्याकाळी करु शकता. अशात आपली पोटावरी तोंद कमी होण्यास मदत होईल. जाणून घ्या कसे कराल-
यासाठी आपले दोन्ही गुघडे वाकवून घ्या आणि दोन्ही पाय सरळ करा. आपली पाठ पुढील बाजूला वाकवा आणि दोन्ही पाय 90 डिग्री एंगल होयपर्यंत पसरवून घ्या. यानंतर आपण आपले एब्स आत करा आणि दोन्ही हात खांद्याच्या उंचीपर्यंत उचलून घ्या. आता जरा वेळ श्वास थांबवा आणि सामान्य व्हा. ही प्रक्रिया रिपीट देखील करु शकता.
 
Leg raise
या व्यतिरिक्त आपण लेग रेज एक्सरसाइज करु शकता. कसे कराल जाणून घ्या- 
सर्वात आधी बिछान्यावर झोपून जा. आपले दोन्ही पाय मिळवून घ्या आणि पाय हळूवार वरील बाजूला उचला. या मुद्रेत काही वेळ असू द्या आणि पुन्हा पाय खालील बाजूस आणा. आपल्या आवश्यकतेनुसार रिपीट करा.
 
नोट- जर आपल्याला कुठलीही शारीरिक समस्या असेल तर हे करण्यापूर्वी एक्सपर्टचा सल्ला घ्या.