शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (14:41 IST)

मधुमेहींनी साखरेऐवजी वापरा गूळ

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरू केला. "त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते."
 
साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते. हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...
 
(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!
(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही. 
(३) साखर ही कोलेस्टरॉल वाढवते. कोलेस्टरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. 
(४) साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. 
(५) साखर ही रक्तदाब वाढवते.
(६) साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.
(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.
(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानिकारक रसायने वापरली जातात.
(९) साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१०) साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.
(११) साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.
(१२) साखर हे पॅरॅलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.
 
कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा.