मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (23:14 IST)

अॅसिडिटी पासून तणाव दूर करण्यापर्यंत गर्भावस्थतेत गुलकंद खाण्याचे फायदे जाणून घ्या

gulkand
गरोदरपणात महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात सर्वसामान्य माणसांप्रमाणे गरोदर महिलांना देखील उष्णतेच्या त्रासाला समोरी जावे लागते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जातो. गुलकंद ही उष्णता शमवतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करतात. त्याची प्रकृती थंड असते. ते शरीराला उष्णतेपासून वाचविण्याचे काम करते. या सोबत गुलकंदचे सेवन केल्याने गर्भधारणे दरम्यान मळमळ, उलटया,अॅसिडिटी आणि तणाव सारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. जर आपल्याला मधुमेह इत्यादी त्रास नसल्यास आपल्यासाठी गुलकंद फायदेशीर ठरू शकतो. गुलकंदचे सेवन करण्याच्या पूर्वी वैद्यकीय परामर्श घ्यावे. उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे जाणून घ्या. 
 
1 बद्धकोष्ठतेचा त्रासापासून आराम - गर्भधारणेत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी गुलकंदचे सेवन उपयुक्त ठरू शकते. गुलकंद आतड्यांची प्रक्रिया सुलभ करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
 
2 शरीराला थंडावा देते- उन्हाळ्यात हार्मोनच्या बदल मुळे अनेकदा महिलांना खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत गुलकंद उष्णतेपासून वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे शरीराला उष्णतेपासून थंडावा देते. 
 
3 गॅस चा त्रास दूर होतो- गुलकंदाचे नियमित सेवन मर्यादित प्रमाणात केल्याने हळूहळू पचनक्रिया सुधारते. गुलकंदाचे सेवन केल्याने पोटातील गॅस, अॅसिडिटी, अपचन सारख्या समस्या दूर होतात. 
 
4 त्वचा स्वच्छ करते- गुलकंदात बॅक्टरीयाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटिव्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने रक्त शुद्ध होते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. या मुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होऊन त्वचा स्वच्छ होते. 
 
5 तणाव दूर होतो - गर्भधारणेच्या दरम्यान महिलांना अनेकदा तणाव आणि मूड बदलतो गुलकंद शरीर आणि मनाला थंड आणि ताजेतवाने करते. या मुळे तणावाची समस्या नियंत्रणात राहते.