रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (17:53 IST)

झिंक आणि व्हिटॅमिन सी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

कोरोनाच्या काळात या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी सर्व प्रकारचे औषधे अवलंब केले जात आहे. मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेतल्या जात आहे.या मुळे आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि झिंकचे प्रमाण देखील वाढेल.मल्टी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या प्रत्येक वयोगटातील लोक घेत आहे. व्हायरसच्या भीतीमुळे यंदा व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांची खप बाजारात अनेक पटीने वाढली आहे.चला तर मग जाणून घेऊ या की या गोळ्या किती प्रमाणात घ्यावयाच्या आहे. आपल्या आहारात याची पूर्तता कशी करता येईल जाणून घेऊ या. 
 
  व्हिटॅमिन सी आणि झिंक योग्य प्रमाणात घेतले पाहिजे.कोणत्याही वस्तूची  अति करणे हानिकारकच आहे. सर्वप्रथम जाणून घेऊ या की व्हिटॅमिन सी ची सामान्य पातळी किती आहे आणि किती प्रमाणात घ्यावे.
 
* व्हिटॅमिन सीची सामान्य पातळी 0.3 मिलीग्राम ते  0.6 मिलीग्राम दरम्यान असावी.
 
* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार 500 मिलीग्राम गोळ्या घेऊ शकतो. पण प्रत्येकाचे शरीर प्रकार वेगवेगळे असतात. म्हणून, केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच  व्हिटॅमिन गोळ्या घ्या.
 
* 18 वर्षावरील अधिक वयाच्या लोकांनी आपल्या आहारात  
90 मिग्रॅ ते 2000 मिलीग्राम व्हिटॅमिन सी घेणे आवश्यक आहे.
 
आपण अन्नामध्ये व्हिटॅमिन सी देखील घेऊ शकता.
 
* संत्री ,लिंबू,आवळ्यात व्हिटॅमिनसी मुबलक प्रमाणात आढळते. संत्री मध्ये सुमारे 70 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळतं.
 
* पेरू मध्ये देखील सुमारे 165 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळतं. 
 
* टोमॅटो आणि बीटरूट मध्ये देखील व्हिटॅमिन सी चे प्रमाण आढळतात. 
 
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेणे हानिकारक आहे.
 
* या मुळे पोट खराब होणं, अतिसार होणं,पथरी होणं सारखे त्रास होऊ शकतात. 
 
* याचा जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील टिश्यू देखील खराब होऊ शकतात. 
 
* झिंक विषाणूच्या संसर्गाशी लढण्यात मदत करतं.झिंक ची सामान्य पातळी जाणून घेऊ या. 
 
*झिंकची सामान्य पातळी 70 ते 290 मायक्रोग्राम आहे.
 
* आपण जेवणात 8 ते 11 मिलीग्राम झिंक घेऊ शकता.
 
* झिंकचे नुकसान -
 
* पोटात जळजळ होणे,अपचन,अतिसार,पोटदुखी होणं,या समस्या सुरु होतात.
 
टीप - ही सर्व माहिती सर्वसाधारण मताच्या आधारे गोळा केली गेली आहे, अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्यावा.