सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (18:52 IST)

घरातील या गोष्टी रोग प्रतिकारक शक्ती सुधारतात

कोरोनाव्हायरस टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या उपायांचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आपण आतून बळकट असाल तर या संसर्गाचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही. 'आतून मजबूत' याचा अर्थ असा की जर रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर आपण कोणत्याही प्रकारच्या संसर्गाला लढा देण्यास सक्षम आहात. रोगप्रतिकारक यंत्रणा बळकट करण्याचा सल्ला तज्ञ देखील देत आहेत.
कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुळे रोग प्रतिकारक शक्ती बळकट होऊ शकते. आपल्या घरातच अशा काही औषधी आहे ज्यांचा वापर करून आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 दालचिनी-बऱ्याचदा अन्नाची चव वाढविण्यासाठी आपण मसाल्यांमध्ये आढळणारी दालचिनी वापरली असेल. दालचिनी अन्नाची चव वाढविण्यासह आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्याचे काम करते. दालचिनीचा वापर रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. दालचिनीमध्ये बरेच अँटीऑक्सिडेंट आणि अँटी बॅक्टेरिया गुणधर्म आहे, जे  आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकत. दालचिनीचा वापर  काढा, चहा किंवा पाणी तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
 
2 आलं -आपण आपल्या स्वयंपाकघरात आलं वापरला असेलच. या मध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस बळकट करण्यासाठी कार्य करते म्हणून अनेक रोगांपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी मानले जाते.सर्दी पडसं झाले असल्यास आल्याचा एक लहान तुकडा या समस्येपासून आराम देण्यासाठी पुरेसा आहे.आपण हे नियमितपणे घेऊ शकता. आपण आल्याचा चहा आणि आल्याला पाण्यात उकळवून काढा म्हणून देखील घेऊ शकता किंवा आलेचा तुकडा देखील  खाऊ शकता. 
 
3 लवंगा -लवंगा प्रतिकारशक्ती वाढविण्याचे चांगले स्रोत आहे. या मध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात हे प्रभावी सिद्ध होते. आपण ऐकले असेलच की जर खोकला झाला असेल तर लवंगा खा म्हणजे खोकला आणि सर्दी बरी होते.  सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी लवंग खूप प्रभावी आहे.
 
4 आवळा - आवळा व्हिटॅमिन-सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी कार्य करते. हे सौंदर्य फायद्यांसाठी ओळखले जाते ,आवळ्याचे आरोग्यदायी  फायदे देखील उत्कृष्ट आहे.
 
5 अश्वगंधा-अश्वगंधा आयुर्वेदिक औषध अनेक रोगांपासून मुक्त करण्यासाठी ओळखले जाते. हे रोग प्रतिकारशक्ती देखील मजबूत करतं.
 
6 लसूण- घरातील स्वयंपाकघरात आढळणाऱ्या लसणाचा वापर अन्नाची चव वाढविण्यासाठी केला जातो, परंतु लसणाचे  आरोग्यासाठी फायदे बरेच आहेत. जर हे नियमित सकाळी अनोश्यापोटी खाल्ले तर लसूण प्रतिकारशक्ती वाढवतं, शिवाय इतर आजारांपासूनही दूर ठेवतं .
 
7 तुळस- तुळशीचे फायदे अगणित आहेत. हे आपल्याला आरोग्यासाठी बरेच फायदे देते. सकाळी अनोश्यापोटी  तुळसीचे सेवन केल्याने बरेच फायदे होतात. सर्दी, ताप, मुडदूस, न्यूमोनिया आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांसाठीही तुळशी फायदेशीर ठरू शकते.
 
8 हळदीचे दूध -हळदीच्या दुधाचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. सर्दी, खोकला यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हळदीचे दूध खूप प्रभावी सिद्ध होते. नियमितपणे झोपण्याच्या पूर्वी हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
 
9 ग्रीन टी -रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्रीन टी खूप फायदेशीर मानली जाते. नियमितपणे सेवन केल्याने रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता बळकट होते.
 
10 गिलोय -गिलोय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. हे निरोगी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे असा विश्वास आहे. त्याचे सेवन शरीराच्या संसर्गाविरूद्ध लढण्याची क्षमता बळकट करते.