गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (19:35 IST)

शरीरासाठी योगा किंवा झुंबा काय योग्य आहे, जाणून घ्या

चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढू लागला आहे. तथापि, बरेच लोक वेळेत सावधही झाले आहेत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. पण जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला तर मग लोक गोंधळतात की योगा किंवा झुम्बा वजन कशाने कमी करायचे ?  आज, आपले हे  गोंधळ दूर करून आम्ही आपल्यासाठी जे चांगले आहे ते सांगत आहोत.
 
1 योगा किंवा झुंबा -शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी योगा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. योगामुळे  शरीरात लवचिकता येते. तर  झुम्बा वर्कआउट नृत्य प्रकारात केल जात. हे वजन कमी करणे आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्रियांवर अधिक केंद्रित आहे.
 
२. कॅलरी - जर आपले वजन जास्त नसेल तर आपण योगासनेही करु शकता. यामुळे कॅलरी बर्न करणे जरा सुलभ होते.  योग आपल्या  वजन आणि वयानुसार केले जाऊ शकते.  जर आपल्याला त्वरीत वजन कमी करायचे असेल तर झुम्बा जास्त चांगले आहे. या मुळे आपण एका तासात 540 कॅलरी बर्न करू शकता.
 
3. लवचिकता आणि शरीर- जर आपल्याला आपले शरीर लवचिक करायचे असेल तर योगा करणे अधिक चांगले आहे. त्याच बरोबर, जर आपण शरीराला योग्य पोश्चर किंवा टोन देऊ इच्छित असाल तर झुम्बा अधिक प्रभावी आहे. झुम्बा केल्याने आपले हृदय देखील मजबूत करते.
 
कदाचित आता आपल्याला योगा किंवा झुम्बा काय करायचे आहे हे जाणून घेणं सुलभ झाले असेल. दोघांचेही वेगवेगळे फायदे आहेत. झुम्बा अधिक चरबीयुक्त बर्न साठी चांगले आहे. तर आपल्या शरीराला लवचिक बनविण्यासाठी आपण योगा निवडले पाहिजे.