शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (19:39 IST)

नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी योगासन

लठ्ठपणा म्हटला की शरीराचा आकार विचित्र दिसू लागतो. ज्याला अनेकदा ढगळ कपडे घालून धकवता येतं परंतू हा लठ्ठपणा चेहर्‍यावर दिसू लागला की ते वाईटच दिसतं. बऱ्याच वेळा असेही असतं की शरीर सडपातळ असतं पण चेहऱ्यावरील चरबी मुळे गुटगुटीत दिसतं. ज्या मुळे सगळे सौंदर्य नाहीसे होतं. जर आपली इच्छा असल्यास की आपले फोटो कोणतेही फिल्टरचा वापर केल्याशिवाय तीक्ष्ण आणि सुंदर दिसावे, तर आपल्या दिनचर्येमध्ये या फेशियल योगासनाचा समावेश करावा. 
 
हे योगासन चेहऱ्याचा लठ्ठपणाच कमी करत नाही तर या योगासनांना केल्यानं नैसर्गिक चमक देखील येते. जी चमक मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. महागड्या केमिकल क्रीम पासून ते फेशियल पर्यंत प्रत्येक गोष्टीत पैसे वाया घालवत असाल. पण या योगासनांच्या साहाय्याने चमकदार त्वचा देखील सहज मिळवू शकतो. 
 
पाऊट
आपण ज्या प्रकारे सेल्फी काढण्यासाठी पाऊट करता आपल्याला आपल्या गालांना त्याच प्रमाणे आतील बाजूस 30 सेकंद ठेवायचे आहे. ही क्रिया थोड्यावेळ आपल्या चेहऱ्याला विश्रांती दिल्यावर किमान चार ते पाच वेळा करायची आहे. आपल्याला असं केल्याने काहीच दिवसात फरक दिसून येईल.
 
छताकडे बघा
जर आपण दोहऱ्या हनुवटीच्या त्रासाने ग्रस्त आहात तर हे योगासन जलद चरबी कमी करण्यासाठी मदत करेल. हे करण्यासाठी आपल्याला चेहऱ्याला वर छताकडे बघायचे आहे. त्याच बरोबर तोंड उघडा. या अवस्थेत 10 -15 सेकंद थांबा थोड्या वेळ विश्रांती घेऊन या क्रियांची पुनरावृत्ती करा. चेहऱ्याच्या चरबीला कमी करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी योग आहे.
 
तोंडात हवा भरा
चेहऱ्याचे योगासन सोपे असतात आपल्याला हे दररोज करण्याची गरज असते. पुढील योगासनासाठी आपल्याला ज्या प्रमाणे आपण तोंडात पाणी भरून गुळणे करतो त्याच प्रकारे हवा तोंडात भरून गुळणे करण्याची क्रिया करावयाची आहे. एकदा डावी कडे तर एकदा उजवी कडे आणि मग मधोमध अश्या प्रकारे हे आपल्याला सुमारे चार ते पाच सेकंद करायचे आहे. असं केल्यानं चेहऱ्याची चरबी कमी होते.
 
जीभ बाहेर काढा
वज्रासनात बसून आपली जीभ बाहेर काढा. शक्य असल्यास जीभ तेवढी बाहेर काढा. पण स्नायूंवर दाब टाकू नका. आता एकदा दीर्घ श्वास घेऊन सोडा. अशी कृती करताना आवाज निघतो. ही प्रक्रिया सहा ते सात वेळा पुन्हा पुन्हा करायची आहे.