सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (18:26 IST)

वायू भक्षण ने ऑक्सिजन पातळी वाढते

कोरोना व्हायरस साथीच्या रोग पासून वाचण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे ,फुफ्फुस बळकट करणे आणि ऑक्सिजनची पातळी वाढविण्याचे म्हटले जात आहे. कोरोना विषाणू हे घातक आहे या पासून संरक्षण ठेवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नये. हाच या रोग पासून बचाव आहे. ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी काही योगा टिप्स अवलंबवावे.  
 
* वायू भक्षण - याचा अर्थ आहे वायूला खाणं. हवा मुद्दाम घशातून अन्न नलिकेत गिळणे. असं केल्यावर ही वायू ढेकरच्या रूपाने परत येते. वायू गिळताना घशावर जोर येतो अन्न नलिकेतून वायू पोटा पर्यंत जाऊन परत येते. 
 
फायदे- वायू भक्षण क्रिया अन्न नलिकेला शुद्ध आणि बळकट करते.या मुळे फुफ्फुस देखील शुद्ध आणि मजबूत होतात. 
   
खबरदारी -ही क्रिया शुद्ध हवेत करावी. घशात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास हे करू नये.
 
भ्रस्त्रिका प्राणायाम - भ्रस्त्रिका म्हणजे भाता या प्राणायाम मध्ये लोहाराच्या भाताप्रमाणे आवाज करत वेगाने शुद्ध वायू आत नेतात आणि अशुद्ध वायू बाहेर सोडतात. सिद्धासन किंवा सुखासनात बसून 
कंबर, मान आणि पाठीचा कणा ताठ करून शरीर आणि मनाला स्थिर ठेवा. डोळे मिटून घ्या आणि वेगाने श्वास घ्या आणि बाहेर सोडा. श्वास घेताना पोटाला फुगवून ठेवा आणि सोडताना पिचकवून घ्या. या मुळे नाभी स्थळावर दाब पडतो. हे प्राणायाम सरावाने केवळ 30 सेकंद केले जाऊ शकते.  
 
फायदे- भ्रस्त्रिका व्यायाम केल्याने शरीराला प्राणवायू अधिक प्रमाणात मिळते या मुळे हे शरीरातील अवयवांमधून दूषित पदार्थ काढून फुफ्फुस मजबूत बनवतात. 
 
खबरदारी- हे करण्यापूर्वी नाक चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या. हे प्राणायाम मोकळ्या आणि स्वच्छ हवेत करावे. हे प्राणायाम क्षमतेपेक्षा जास्त करू नये. दिवसातून एकदाच हा प्राणायाम करा. एखाद्याला काही आजार असल्यास त्यांनी हे प्राणायाम योग शिक्षकाच्या सल्ल्यानुसारच करावे.