कोरोना काळात केवळ 10 मिनिटं ध्यान करा आणि परिणाम बघा
अनिरुद्ध जोशी
डॉ. म्हणतात की भीतीमुळे प्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. या साठी ध्यान करावे. जेणे करून आपल्या प्रतिकारकशक्तीमध्ये वाढ होते.या मुळे तणाव देखील नाहीसे होतात.कोणत्याही प्रकाराची भीती,काळजी इतर विकार देखील होत नाही.ध्यान केल्याने मन आणि मेंदू शांत राहतो. सध्या कोरोनाच्या काळात ध्यान करणे खूप महत्त्वाचे आहे.
1 आजार आणि दुःख दोघांची उत्पत्ती मन,मेंदू आणि शरीराच्या ज्या भागात होते ध्यान त्या भागाला निरोगी बनवते.हे मन आणि मेंदू सकारात्मक ऊर्जाने भरते. आपले शरीर आजाराशी लढण्यात सक्षम होते. या मुळे आजाराचा नायनाट होतो.
2 ध्यान केल्याने श्वासोच्छ्वासात सुधारणा झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचे त्रास होत नाही.काळजी दुःख कमी होते. आपल्या भावना श्वासाने नियंत्रित केल्या जातात. योग्य
श्वासोच्छवासामुळे भावना देखील नियंत्रित केल्या जातात.सर्व भीती, काळजी या मुळे दूर होते.बघण्याच्या दृष्टीकोन देखील सकारात्मक होतो.
3 ध्यान केल्याने उच्च रक्तदाब देखील नियंत्रित होतो. डोकेदुखी दूर होऊन रोग प्रतिकारकशक्ती वाढते. शरीरात स्थिरता वाढते. या मुळे शरीर मजबूत होत.
4 दररोज तीन महिन्यासाठी फक्त 10 मिनिटं ध्यान करावे. या मुळे मेंदूत सकारात्मक परिवर्तन होतात. कोणत्याही प्रकाराच्या समस्येला सकारात्मक दृष्टीकोनाने सोडवू शकाल.ध्यान मध्ये फक्त तीन महिन्यांत सर्व प्रकारचे आजार नाहीसे करून दुःख दूर करण्याची क्षमता आहे.
5 ध्यान करण्यासाठी सर्वप्रथम स्नान करून कुशासनवर सुखासनात डोळे मिटून बसावे. आपल्याला डोळे फक्त 10 मिनिटासाठी मिटायचे आहे. या दरम्यान शरीराची हालचाल करायची नाही. डोळ्यासमोर येणाऱ्या अंधाराकडे बघावे आणि श्वासोच्छवासाच्या हालचाली ला अनुभवा. या वेळी आपल्या मनात अनेक विचार येतील आणि जातील त्या विचारांना जाणीवपूर्वक बघा. एक विचार येईल आणि जाईल लगेच दुसरा विचार येईल. मानसिक हालचाली कडे लक्ष द्या. आपल्याला जाणवेल की श्वासोच्छवासाच्या हालचाली कडे लक्ष दिल्यावर मानसिक हालचाल थांबते. आपल्याला हेच करायचे आहे.