बेस्ट कर्मचारी विश्रांतीगृहात १ हजार पंखे आणि २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करा

st buses
Last Modified मंगळवार, 27 एप्रिल 2021 (09:52 IST)
मुंबईत बेस्ट उपक्रमात कोरोनाची पर्वा न करता आपले प्राण धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालक, बसवाहक आणि परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी यांच्यासाठी विश्रांतीगृहात १ हजार पंखे आणि २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी बेस्टचे हंगामी महाव्यवस्थापक आणि पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.
२४ एप्रिल रोजी आपण स्वतः बेस्ट उपक्रमाच्या वडाळा, प्रतीक्षानगर, आणिक आणि वांद्रे आगाराला भेट दिली होती. मात्र त्या ठिकाणी सुरू असलेल्या अक्षम्य गलथानपणामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी केला आहे. तसेच, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आल्या आहेत. त्यामुळेच आपण स्वतः कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची मागील २ वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे आणि त्या ठिकाणचे फॅन, कुलर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याचे आशिष चेंबूरकर यांनी म्हटले आहे. त्यामुळेच, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहात १००० पंखे आणि २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करुन सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात यावा, असे निर्देश आशिष चेंबूरकर यांनी या पत्रातून दिले आहेत.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

आता तुम्ही WhatsApp वर तुमच्या फोटोचे Sticker सहज बनवू शकता

आता तुम्ही WhatsApp वर तुमच्या फोटोचे Sticker सहज बनवू शकता
आम्ही मित्र आणि नातेवाईकांना स्टिकर्स पाठवतो जेणेकरून WhatsApp वर बोलणे सोपे होईल. ...

ममता दीदी महाराष्ट्र दौऱ्यावर

ममता दीदी महाराष्ट्र दौऱ्यावर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या तीन दिवसी दौऱ्यासाठी मुंबईत दाखल ...

कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाल्याने तेथून ...

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ...

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये
मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या ...

आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका

आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन ...