गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (11:35 IST)

Coronavirus वर मात करायची असेल या 10 गोष्टी आपल्या जीवनात समाविष्ट करा

कोरोनाव्हायरसने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. प्रत्येकजण या व्हायरसपासून मुक्त होण्यासाठी आणि हा विषाणू टाळण्यासाठी सर्व पद्धतींचा वापर करीत आहे. परंतु कोरोनाबद्दल इतकी भीती आहे की जर हवामानातील बदलामुळे सर्दी-खोकला उद्भवला असेल तर लोक त्यास फक्त कोरोनाशी संबद्ध करून पहात आहेत, कारण कोरोनाव्हायरसची लक्षणे देखील थंड, ताप, वाहती नाक, खोकला आहेत. अशा परिस्थितीत अस्वस्थ किंवा घाबरून जाण्याऐवजी काही गोष्टी आपल्या जीवनात समाविष्ट करणे आवश्यक आहे जेणेकरून व्हायरसवर विजय मिळू शकेल, ते देखील कोणत्याही भीतीशिवाय. चला जाणून घेऊया कोरोनाव्हायरस टाळण्यासाठी आपल्या जीवनात कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
 
वैयक्तिक स्वच्छता हा कोरोना टाळण्याचा एक प्रभावी मार्ग आहे, म्हणून आपले हात स्वच्छ ठेवण्यास विसरू नका. कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी हात धुणे हा सर्वात अचूक मार्ग आहे. जर आपण घरा बाहेर असाल तर यासाठी वेळोवेळी हात सॅनिटाइज करत राहा. जर आपण घरात असाल साबणाने हात धुवत राहा. 
 
आपण घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. जेव्हा आपण घराबाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाल तेव्हा मास्क वापरा.
 
अनेक लोकांची वारंवार डोळे चोळण्याची किंवा चेहर्‍यावर हात लावण्याची सवय असते। कोरोना व्हायरसपासनू बचावासाठी आपल्याला वारंवार चेहर्‍याला हात लावणे टाळावे.
 
कोणाही भेटल्यावर हात मिळवणे टाळा. गळाभेट करु नका. कारण याने व्हायरस पसरण्याची भीती असते.
 
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, कारण लक्षणं नसेललं लोकं देखील व्हायरस पसरवू शकतात. 
 
आपला मोबाइल व लॅपटॉप वेळोवेळी स्वच्छ करत रहा.
 
बाहेरुन घरी आल्यावर इतर कुणाशी संपर्क न करता अंघोळ करणे, किंवा हात-पाय धुणे, बाहेरचे कपडे बदलणे आवश्यक आहे. बाहेरचे कपडे थेट धुण्यासाठी टाकावे.
 
हर्बल टी चे सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वृद्धी होते.
 
रात्री झोपण्यापूर्वी हळद मिसळलेल्या दुधाचे सेवन करावे. याने इम्युन सिस्टम मजबूत होण्यास मदत होते.
 
पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास करणे टाळावे तरी प्रवास करणे आवश्यक असेल तर मास्क, ग्लव्ज वापरावे.