संबंधित माहिती
- Preserve Pickles लोणची टिकवण्यासाठी काही उपाय
- Tricks of Lemon लिंबाच्या या युक्त्या गरीबांनाही श्रीमंत करतात
- Ranji Trophy 2023: कधीकाळी लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीवर नाव कसं कोरलं
- Sugar Control लिंबू या पद्धतीने खा
- weight loss : वजन कमी करण्यासाठी जिर्याच्या चहासोबत मध आणि लिंबूचे करा सेवन
Drink lemon water लिंबूपाणी प्या आणि सदैव निरोगी राहा
सदैव ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चांगले. लिंबूमध्ये क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. शरीरासाठी आवश्यक असणारी क जीवनसत्वाची कमतरता लिंबूपाणी सेवनाने भरून काढता येते.
लिंबूपाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच पोटॅशिअमचीही गरज पूर्ण होते. पोटॅशिअमुळे आपल्या मेंदूला फायदा होतोच आणि ब्लडप्रेशरवरही ताबा ठेवता येतो. तुम्हाला जर चहा कॉफीची सवय कमी करायची असेल तर लिंबूपाणी उत्तम.
लिंबूपाणी सेवनाचा आणखी एक फायदा तो म्हणजे रक्तशुद्धी ज्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होतेच आणि शरीर ताजेतवाने राहते. जीवनसत्वाने भरपूर आणि लाभदायक असे हे लिंबूपाणी कधीही सेवन केले तरी चालते मात्र रात्री जेवणानंतर घेऊ नये. हे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
