शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (16:31 IST)

Mobile phone side effect: फोनच्या अतिवापराचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घ्या

listen phone though left ear
Mobile phone side effect:फोनच्या अतिवापरामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. मानसिक ताण वाढणे, डोळ्यावर दुष्परिणाम होणे, सारखे त्रास वाढतात. फोनच्या अति वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामा बद्दल जाणून घेऊ या. 
 
1 डोळ्यांना नुकसान होणं -
मोबाईलचा सतत वापर केल्याने डोळ्यांवर ताण येतो. काहीवेळा आपल्याला ते कळत नाही, परंतु यामुळे आपल्या डोळ्यांना नुकसान होऊ शकते. आपले डोळे शरीराच्या सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहेत. मोबाईलच्या निळ्या स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यांना खूप नुकसान होऊ शकते.
 
यामुळे गंभीररित्या डोकेदुखी, डोळा दुखणे आणि डोळे कोरडे होऊ शकतात. अशा परिस्थितीत, सेल फोन वापरताना अधून मधून ब्रेक घेणे खूप महत्वाचे आहे.
 
2 मनगटात वेदना होणं -
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर हे वाईटच. त्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तु म्हटली तर ती वापरताना आपण सावधगिरी बाळगणे चांगले. फोनच्या अतिवापरामुळे मनगटात सुन्नपणा आणि वेदना होऊ शकतात. यामुळे तुम्हाला हातावरती ताण येईल आणि दुसरं काम करताना तुम्हाला त्रास उद्भवू शकतो.
 
3 मुरूम होणं -
फोनच्या हानिकारक किरणांमुळे तुम्हाला मुरुमांचा त्रास उद्भवू शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, मोबाईलमध्ये जंतू आणि बॅक्टेरिया असतात जे तुमच्या त्वचेवर येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर डाग येऊ शकतात. तसेच ते अकाली वृद्धत्वाचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा मोबाईल दररोज पुसून स्वच्छ करून वापरावे.
 
4 निद्रानाश होणे -
झोप हा आपल्या जीवनशैलीचा सर्वात आवश्यक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली झोप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेची वेळ कमी होते. यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटत नाही तसेच दिवसा झोपही येते. मोबाईलच्या अतिवापरामुळेही कधी कधी निद्रानाश होतो. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यासह तुमच्या कामावर देखील होतो.
 
5 तणाव वाढणे -
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणाव येतच असतो. परंतु बऱ्याचदा अनेक गोष्टी फोनमध्ये वाचल्याणे, ऐकल्याने, जास्त  ताण तणाव येतो. ज्याचे नंतर गंभीर आजारात रुपांतर होऊ शकते.
 
6 मेंदूचा कर्करोग-
मोबाइलच्या अतिवापरामुळे किंवा तुम्ही मोबाइलने खूप बोलत असाल किंवा तुम्ही अनेक तास मोबाइलवर बोलत राहिल्यास. त्यामुळे तुम्हाला मेंदूचा कर्करोगही होऊ शकतो. असे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण शक्यता नाकारता येत नाही.  मोबाईलवरून बोलताना त्यातून एक रेडिएशन बाहेर पडतो. हे आपल्या आरोग्यासाठी आणि मेंदूसाठी हानिकारक असतो.
 
7 मान आणि पाठदुखी होणे -
मोबाईलच्या अतिवापरामुळे मान खालच्या दिशेने राहते, ज्यामुळे मान दुखीची समस्या उद्भवू शकते. तसेच मोबाईलचा अति वापर केल्यावर हळूहळू डोकेदुखीची समस्या देखील होऊ शकते. जास्त वेळ मोबाईल वापरल्याने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.