रोज किती अंडी खावीत? जाणून घ्या 11 फायदे
अंडी रोज खाणं खरंच फायदेशीर असतं का? सर्वोत्तम एनर्जी बूस्टर अंडी खाण्याचे फायदे जाणून घ्या-
दररोज एक अंड्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील फॅटची एक दिवसाची गरज पूर्ण होते.
अंडी खाल्ल्यानंतर तुमची भूक शांत होते आणि तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता. अशावेळी वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
दररोज एक अंडं खाल्ल्याने कॅरोटीनोइड्स मिळतात, ज्यामुळे डोळ्यांच्या पेशींची झीज रोखता येते. याशिवाय मोतीबिंदूचा धोकाही कमी होतो.
अंडी केओलिनचा एक चांगला स्रोत आहे, जो रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठण्याची शक्यता, आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यास मदत करतो.
अंडी एक उत्तम ऊर्जा बूस्टर आहे. याच्या पिवळ्या भागात हेल्दी फॅट्स असतात जे एनर्जी प्रदान करण्यात मदत करतात. नाश्त्यात अंडी खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जी जाणवेल.
यामध्ये अल्ब्युमिन प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते. शरीरातील प्रथिनांची कमतरता पूर्ण करून आवश्यक पोषण प्रदान करण्यात मदत होते.
एका संशोधनानुसार, आठवड्यातून 6 अंडी खाणाऱ्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 44 टक्क्यांनी कमी होता.
एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम उच्च दर्जाचे प्रथिने आणि शरीराला आवश्यक असलेले 9 अमीनो ऍसिड असतात. सल्फरसह इतर खनिजे आणि जीवनसत्त्वे असल्यामुळे अंडी केस आणि नखांसाठी चांगली असतात.
व्हिटॅमिन डी देखील अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते, जे हाडे मजबूत करण्यासाठी खूप आवश्यक आहे.
अंड्यांमध्ये ए, डी, बी 12, रिबोफ्लेविन, फॉस्फरस आणि फोलेट या जीवनसत्त्वांसह भरपूर पोषक असतात. हे सर्व शरीराचे कार्य सुरळीत राहण्यास मदत करतात.
अंडी हे पोषक तत्वांचे, विशेषत: प्रथिनांचे भांडार आहे. एका अंड्यामध्ये 75 कॅलरीज, 7 ग्रॅम उच्च दर्जाचे प्रथिने, 5 ग्रॅम फॅट आणि 1.6 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.