शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (20:30 IST)

काय सांगता, ऑलिव्ह तेल मुलांसाठी फायदेशीर आहे

olive oil is beneficial for children   health tips in marathi
ऑलिव्ह तेल मुलांसाठी फायदेशीर आहे हे जाणून घेतल्यावर आपल्याला वापरण्याची इच्छा होईल. मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे ऑलिव्ह तेलाचे फायदे जाणून घेऊ या.  
 
* बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो - 
मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास हे वापरू शकता. शरीरात हे रेचक प्रमाणे काम करत. जे मुलास निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठता दूर करते. चवीला कडवट असल्याने त्यांना पाण्यात किंवा फळांच्या रसात मिसळून द्यावं. नियमितपणे हे दिल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.  
 
* वजन वाढत-
मुलांचं वजन वाढत नसल्यास आईला काळजी होणं स्वाभाविक आहे. मुलांचे वजन वाढण्यासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर करू शकता या साठी जेवणात ऑलिव्ह तेल मिसळू शकता किंवा दूध, पाणी आणि ज्यूस मध्ये देखील मिसळून मुलाला देऊ शकता. लक्षात ठेवा की अनोश्या पोटी मुलाला हे द्यायचे नाही.  
 
* केसांसाठी ऑलिव्ह तेल -  
ऑलिव्ह तेलात अँटिऑक्सिडंट चे गुणधर्म असतात  जे मुलांच्या केसांना आणि स्कॅल्प ला निरोगी ठेवतात. बरेच लोक मुलाच्या डोक्याची मॉलिश या तेलाने करतात. आपण देखील मुलाचे केस बळकट आणि मऊ करू इच्छिता तर ऑलिव्ह तेल प्यायला द्या. मुलांमधील कोंड्याच्या त्रासाला देखील हे दूर करत.  
 
* त्वचेसाठी फायदेशीर -
ऑलिव्ह तेलात असलेले व्हिटॅमिन बी आयरन, जिंक आणि सल्फर मुलांच्या त्वचेला कोवळी, निरोगी आणि चमकदार बनविण्यासह सर्दी पडसं आणि खाज येणाच्या त्रासाला दूर करते.. मुलांच्या मानसिक विकासासाठी देखील या तेलाचा वापर केला जातो. सर्व समस्यांवर प्रभावी आहे ऑलिव्ह तेल.