आरोग्यदायी टिप्स अवलंबवा निरोगी राहा
आपण आपल्या आरोग्याला चांगले ठेवण्यासाठी काळजी घेतो.आहारात देखील पोषक घटक असलेले पदार्थांचा समावेश करतो. जेणे करून आपले आरोग्य चांगले राहील. आज काही आरोग्यदायी टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण निरोगी राहाल चला तर मग जाणून घेऊ या.
* वजन कमी करण्यासाठी मीठ कमी प्रमाणात घ्या.
* सावकाश जेवण करा, भरभर जेवल्याने लठ्ठपणा येतो.
* वेळेवर जेवण करा,दिवसभर फळ आणि सॅलड खा.
* दिवसात डाएटसोडा घेणं टाळा.
* स्वयंपाक करताना फॅट ची काळजी घ्या.अन्नात तेल,बटर,क्रीम, चीज,कमी प्रमाणात वापरा.
* रात्रीच्या जेवणानंतर काहीच खाऊ नका.
* रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट घेणं टाळा.
* रात्रीच्या जेवणात स्नॅक्स खाणे टाळा.
* ऑफिसात असताना दुपारचे जेवण मित्रांसह शेयर करा. कॅलरी तपासण्याचा हा चांगला मार्ग आहे.
* रात्री पुरेशी झोप घ्या.