रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (11:00 IST)

आरोग्य टिप्स- या 5 पद्धतीने जाणून घेऊ या की आपण तंदुरुस्त आहात की नाही

सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणेच कठीण झाले आहेत. ऑफिस आणि घर या मध्येच सगळा वेळ निघत आहे.या धावपळीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. व्यस्त असल्यामुळे जिम जाणं शक्यच नसते. तरी ही काही लोक आपल्या तंदुरुस्ती ला घेऊन सज्ज असतात. लोक जिम मध्ये जाऊन वेगवेगळे प्रयोग करतात तरी त्यांच्या मनात प्रश्न असतो की आपण केवढे फिट आहोत आणि किती नाही? या साठी आम्ही सांगत आहोत असे काही आरोग्याचे टिप्स ज्या मुळे आपण जाणून घेऊ शकाल की आपण किती तंदुरुस्त किंवा फिट आहात.
 
1  पुरेशी आणि चांगली झोप घेता-
आपण त्या काळाची आठवण करा जेव्हा आपल्याला रात्री झोपच येत नसायची, जर हे आठवत नसेल तर ह्याचा अर्थ आहे की आपण स्वस्थ आहात. वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. आपण निरोगी आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी एक अजून पद्धत आहे आपण सकाळी उठल्यावर कसे अनुभवता जर आपल्याला निरोगी आणि प्रसन्नदायक वाटते का जर आपले उत्तर होकारार्थी आहे तर आपण तंदुरुस्त आहात.
 
2 पचन प्रणालीत सुधारणा- 
जर आपली ऍसिडिटी ,बद्धकोष्ठता आणि पोटातली सूज कमी झाली आहे, तर आपण तंदुरुस्त आहात. वजन कमी करणे आणि चांगल्या आहारासह विष्ठा काढल्याने कमी होणाऱ्या वायूचा अतिरिक्त फायदा मिळतो, म्हणून बऱ्याचवेळा आपण बघता की वजन केल्यावर देखील काहीच कमी दिसत नाही तर ह्याचा अर्थ आहे की आपली पचन प्रणाली सुरळीत होत आहे.तरीही आपण अनावश्यकपणे अस्वस्थ होत आहात.
 
3 पाणी किती पिता-
दररोज किमान 10 -12 ग्लास पाणी आवर्जून प्यावं. जेवण्याबरोबर पाणी पिणं नुकसानदायी होऊ शकत.जेवण्याच्या अर्ध्यातासापूर्वी 1 ग्लास पाणी पिणं फायदेकारक आहे. या मुळे आपण जेवण कमी प्रमाणात घेतो.जेवण्याच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्यावं.
 
4 आपले कपडे आपल्याला व्यवस्थित येतात -
जर जुने कपडे निरोगी आहार आणि व्यायामासह चांगले येतात तर आपण पूर्वीपेक्षा बरेच तंदुरुस्त झाला आहात.जर आपली जीन्स आपल्याला सैल होत आहे आणि काही वर्षांपूर्वीच्या टॉप किंवा शर्ट आपल्याला व्यवस्थित येत आहे तर आपण बारीक होत आहात.
 
5 आपल्याला अधिक सक्रिय वाटतं -
जास्त प्रमाणात वजन वाढल्याने आपण संपूर्ण दिवस स्वतःला थकलेलं आणि सुस्त जाणवत होता जेव्हा आपण निरोगी होता तेव्हा जुन्या सवयी सोडून सक्रिय होता. जर आपण नियमितपणे व्यायाम करता तर आपण स्वतःला अधिक सक्रिय अनुभवता. कमी आळस येणं आणि कमी झोप येणं देखील निरोगी आणि तंदुरुस्त असण्याची लक्षणे आहेत.