शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (12:00 IST)

आरोग्य दायी टिप्स अवलंबवा आणि निरोगी राहा

असं म्हणतात की माणसाचं आरोग्य चांगले असेल तर तो जग जिंकू शकतो. निरोगी राहण्यासाठी काही चांगल्या सवयींना आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनवावा लागतो. ह्या चांगल्या सवयी लावल्याने आणि अवलंबवून आपण निरोगी आणि फिट राहू शकता. त्या चांगल्या सवयींमध्ये चांगलं खाणं-पिणं, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणं तर आहेच पण  या व्यतिरिक्त काही आरोग्य टिप्स आहे ज्यांना अवलंबविल्याने ते आपल्यासाठी जणू अमृताचे काम करत. हे अवलंबविल्याने आपण नेहमी निरोगी राहाल.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 सकाळी लवकर उठणे -
आपल्याला दररोज सूर्योदयाच्या पूर्वी उठाव. सकाळची वेळ अमृत वेळ मानली आहे.सकाळी 4 ते 5 वाजता दरम्यान उठल्यानं शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात. सकाळची वेळ व्यायाम करायला, वॉकसाठी आणि ध्यान करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील ही वेळ अभ्यासासाठी चांगली मानली आहे.
 
 2 सकारात्मक राहणे-
हे तर विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे की नेहमी सकारात्मक राहिल्यानं आपल्या आरोग्यावर देखील त्याचा चांगला परिणाम होतो. सकारात्मक विचारसरणी ठेवणारा व्यक्ती बऱ्याच आजारांपासून वाचतो. त्याला जास्त तणाव देखील होत नाही आणि थकवा देखील जाणवत नाही. अशी व्यक्ती नेहमी निरोगी आणि यशस्वी जीवन जगते. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा.जेणे करून कोणत्याही परिस्थितीवर मात देऊ शकाल.
 
3 फळे आणि सुकेमेवे खावे-
फळ आणि सुकेमेवे जास्त खाल्ल्यानं शरीर नैसर्गिकरीत्या निरोगी अनुभवतो. आपले शरीर फळांना 2 तासात पचवतो. पण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला 6 ते 8 तास लागतात. कोणत्याही पदार्थाचे सेवन केल्यावर आपले शरीर जेवढ्या लवकर ते पचन करेल तेवढेच आपण निरोगी राहू. सुकेमेवेत बदाम आणि अक्रोड आवर्जून वापरा. लक्षात ठेवा की एकावेळेस केवळ 28 ग्रॅम पेक्षा जास्त सुकेमेवे वापरू नका.
 
4 चहा-कॉफी आणि फास्टफूडचे सेवन करू नका- 
चांगले निरोगी आयुष्य जगायचे असल्यास चहा,कॉफी,फास्टफूड चे सेवन बंद करा. आणि या  तिन्ही गोष्टी सोडणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण ह्याला पर्याय म्हणून एखादे आयुर्वेदिक पेय घेऊ लागाल.फास्ट फूड बाहेरचे न खाता घरात बनवून खा. 
 
5 आयुर्वेदिक औषधे-
आपण चांगले आणि निरोगी जीवन जगण्यासाठी काही चांगल्या आणि आयुर्वेदिक औषधांचा सेवन करू शकता. आपण दररोज तुळशीची पाने,ग्रीन टी, आलं,लसूण,आवळा,ह्याचे सेवन नियमितपणे करावे. हे सर्व नैसर्गिक औषधे म्हणून काम करतात आणि आपल्याला आजारी होण्यापासून वाचवतात.