मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (19:38 IST)

हे 7 सुपर फूड जे स्टॅमिना आणि ऊर्जा वाढवतील

आपण लवकर थकता आणि पायी चालणे टाळता, पायऱ्या ऐवजी लिफ्ट ने जाता तर ह्याचा अर्थ आहे की आपल्या शरीरात स्टॅमिना कमी आहे आणि ह्याचें प्रमुख कारण आहे एकाच ठिकाणी बसून राहणे आणि सक्रिय जीवनशैलीचा अभाव होणं. 
 
लॉक डाउन नंतर ही समस्या घर-घरात दिसून येते. बऱ्याच वेळा स्टॅमिना वाढविण्यासाठी जिम जाणं सुरू करतो किंवा जॉगिंगची योजना आखतो.पण एका दोन दिवसातच त्याच जीवनशैलीकडे वळू लागतो. अशा परिस्थितीत हे समजून घेणं आवश्यक आहे की आपण आपल्या शरीराला एनर्जी किंवा ऊर्जा देणारे आहार देणार नाही तो पर्यंत आपले शरीर मेंदूचे ऐकणार नाही.अशे काही 7 सुपरफूड आहे जे स्टॅमिना आणि ऊर्जा वाढवतात. चला तर मग त्यांच्या बद्दल जाणून घेऊ या.
 
1 केळी-
केळी हे सुपरफूड च्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. या मध्ये कार्बोहायड्रेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, या मध्ये नैसर्गिकसाखर आणि स्टार्च देखील आढळते. ह्याचे सेवन केल्याने हे दिवसभर ऊर्जा देण्याचं काम करत आपण जिम जाण्यापूर्वी देखील हे घेऊ शकता. 
 
2 दही - 
कॅल्शियम,आणि प्रथिनांनी समृद्ध दही आपल्या न्याहारीत समाविष्ट करावे. हे आपण फळे आणि इतर सुके मेवेसह देखील खाऊ शकता.  हे हाड बळकट करून स्नायूंना देखील ऊर्जा देतं.
 
3 दलिया किंवा सांजा -
आपल्याला जाणून आश्चर्य होईल की हे आपल्या शरीराला त्वरित बूस्ट करण्याची क्षमता ठेवत. सांजा आपण खिचडी आणि पुलाव सारखे देखील खाऊ शकतो. चवीत हे चांगले असते. सकाळी न्याहारीत खाल्ल्यावर बऱ्याच वेळा भूक लागत नाही आणि दिवसभर आपण ऊर्जेने समृद्ध राहाल. या मुळे स्टॅमिना देखील वाढेल. 
 
4 अंडी -
हे लगेच बनतात आणि पोषक घटकाने समृद्ध असतात. हे हाड आणि स्नायू दोन्ही बळकट करतात. अंडी हे लोकांची पहिली आवड आहे. या मध्ये अमिनो ऍसिड आढळते ज्यामुळे थकवा दूर होतो. 
 
5 पीनट बटर-
शेंगदाण्याने बनलेले हे बटर निरोगी अन्न प्रवर्गातील आहे. निरोगी फॅट आणि प्रथिन असल्यामुळे आपण हे मल्टिग्रेन ब्रेड बरोबर सकाळी खावे. हे खाल्ल्यावर बऱ्याच काळ ऊर्जेने भरलेले राहाल. 
 
6 बदाम- 
हे देखील या श्रेणीत आहे हे हेल्थी फॅट पावरहाऊस सुकामेवाच्या रूपात न्याहारीत समाविष्ट करा. हे पोषक घटकांनी समृद्ध आहे. मेटॅबॉलिझम वाढविण्यात मदत करते तसेच स्टॅमिना वाढविण्यासाठी देखील हे कामी येत. रात्री भिजत घालून सकाळी अनोश्या पोटी खावं.
 
7 ओट्स- 
फायबर आणि कार्बोहायड्रेट ने समृद्ध ओट्स आळस दूर करत. हे बऱ्याच काळ काम करण्यासाठी ऊर्जा देण्यात सक्षम आहे. जर आपण ओट्स चे सेवन करता तर आळस आणि थकवा आपल्या पासून खूप लांब राहील.