मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (08:40 IST)

या 5 सवयी आपलं अवघं आयुष्य बदलतील अवलंबवून बघा

आपण दररोज जाणता -अजाणता आपल्या जीवनशैलीशी  खेळ करतो. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पडतो अशा परिस्थितीत एक चांगली जीवनशैली अनुसरणं करणे महत्त्वाचे आहे. 
 
एकीकडे कोरोनाच्या साथीच्या रोगाने लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे, तर बऱ्याच काळ लॉकडाऊन मध्ये राहून लोकांच्या मानसिक स्थितीवर देखील त्याचा परिणाम पडला आहे. असं म्हणता येऊ शकत की लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. आपल्याला आपल्या आरोग्याला चांगले ठेवण्यासाठी आपल्या सवयी मध्ये बदल घडून आणला पाहिजे. ज्या मुळे निरोगी राहण्यासह आपली प्रतिकारक शक्ती देखील वाढेल. 
 
1 चहा कॉफी ला नाही म्हणा- 
आपण आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी पासून करतो. ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा पोटाशी निगडित इतर समस्या आहे त्यांनी अजिबात ह्याचे सेवन करू नये. म्हणून सकाळी कोमट पाणी पिणं त्यांच्या साठी  चांगले राहील.
 
2  न्याहारी घेणे- 
आपण सहसा न्याहारी घेत नाही. चांगल्या आरोग्यासाठी सकाळची न्याहारी घेणं आवश्यक आहे. या मुळे आपण दिवस भर तजेल राहता. आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील पडतो. भिजत घातलेले बदाम आणि गव्हाची पोळी आणि फळे आपल्या न्याहारीत समाविष्ट करा. 
 
3 व्यायाम -
सकाळी उठल्या-उठल्या आपण मोबाईल हाताळतो. ह्याचा ऐवजी सकाळचा वेळ काही व्यायामासाठी द्यावा. सकाळी केले जाणारे व्यायाम आरोग्यासाठी  चांगले असतात. 
 
4 रात्री मोबाईल वरून संदेश करणे टाळा- 
दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री चांगली झोप घेणं चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. बऱ्याचदा लोक सोशल साईटवरील जे मेसेज दिवस भरात  बघू शकत नाही तर रात्री उशिरा बघतात आणि उशिरा झोपतात ज्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि ह्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर पडतो. चांगली झोप  घेतल्यानं मेंदू ताजेतवाने होईल आणि चांगले अनुभवाल.
 
5 जंक फूड खाणं टाळा- 
पाणी कमी पिणं आरोग्यासाठी चांगले नाही. या शिवाय जास्त गोड खाण्याची सवय देखील चांगली नाही तळकट,तुपकट भाजके खाणं टाळा. जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन देखील करू नका. या मुळे मधुमेह,आणि हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो. वजन देखील वाढू शकत. आरोग्य चांगले राहील या साठी  घरात बनलेले जेवण करा.