शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (16:30 IST)

काय सांगता, पपईचे बियाणे फायदेशीर आहे

पपई हे खूप फायदेशीर फळ आहे. पपईचे सेवन केल्यानं बऱ्याच आजारांमध्ये आराम मिळतो. पपईमध्ये ते सर्व गुणधर्म आढळतात जे पोटाच्या विकारांना दूर करतात.पपईच्या बरोबरच त्याची साले आणि बियाणे देखील खूप कामाचे आहे. पपईच्या बियाणांचा वापर अनेक प्रकारे केला जातो. हे बियाणे एखाद्या फळाप्रमाणेच फायदेशीर आहे, हे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी लढायला मदत करतात. पपईच्या बियाणांचे इतर फायदे देखील जाणून घेऊ या.
 
1 पाचक प्रणाली सुधारते  - 
पपईमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे पचन तंत्र सुधारण्यास मदत करतात.बऱ्याच वेळा बाहेरचे खाऊन पोटात बिघाड होते बऱ्याच वेळा तर अन्नामधून विषबाधा देखील होते.अशा परिस्थितीत पपईच्या बियाणांचे सेवन करावे. दररोज पपईच्या बियाणे सकाळी पाण्यासह घ्यावे किंवा ह्याची भुकटी बनवून देखील नियमितपणे घेऊ शकता.
 
2 लिव्हर साठी फायदेशीर -
पपईचे बियाणे पोटा प्रमाणे लिव्हरसाठी देखील फायदेशीर आहे.पपईचे बियाणे मिक्सरमध्ये वाटून  त्यांचा रस काढून घ्या. ह्यामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि नियमितपणे  एक महिना दररोज ह्याचे सेवन करा. असं केल्याने लिव्हरशी निगडित सर्व विकार हळू-हळू नाहीसे होतील.
 
3 कर्करोगाशी लढण्यात सहाय्यक -
पपईमध्ये अँटी ऑक्सीडेन्ट आढळतात, जे फुफ्फुसांचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, स्तनाचा कर्करोगाशी लढण्यात मदत करतात. कर्करोगाशी लढण्यासाठी पपईचे बियाणे खाण्यासाठी वाळवून घ्या आणि वाटून घ्या नंतर नियमितपणे ह्याचे सेवन करा. असं केल्याने कर्करोगाशी लढण्यास मदत मिळते,जरी आपण दररोज ह्याचे सेवन कराल तर कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.
 
4 जळजळ आणि सूज मध्ये आराम देत- 
त्वचेवर कोणत्याही प्रकारची सूज किंवा जळजळ झाल्यास पपईच्या बियाण्यांचे सेवन दररोज करावे.पपई मध्ये अँटी बेक्टेरियल गुणधर्म आढळतात. तसेच ह्यामध्ये अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म देखील आढळतात. बियाणांमधून तेल किंवा रस काढून सुजलेल्या जागी किंवा जळजळ होत असल्यास जागी लावल्यानं आराम मिळतो. हे रस दिवसातून 2 ते 3 वेळा लावा. लवकरच शरीरावर आलेली सूज आणि जळजळ नाहीशी होईल.