रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (12:00 IST)

आरोग्य टिप्स : यशस्वी होण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी या टिप्स अवलंबवा

प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ इच्छितो. तो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु तो यश तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा तो तंदुरुस्त आणि निरोगी राहील. बरेच लोक काही न काही विकारांशी झुंजतं आहे. त्यामुळे त्यांना यश मिळवणे अवघडच असणार. आज आम्ही सांगत आहोत की निरोगी कसं राहता येईल. या साठी काही सोप्या टिप्स सांगत आहो ज्यांना अवलंबवून आपण निरोगी राहू शकाल.
 
1 सकाळी पाणी प्यावं-  
निरोगी राहण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे सकाळी उठून 3 ते 4 ग्लास पाणी प्यावं. असं केल्यानं शरीरातील विषारी टॉक्सिन बाहेर पडतात. लक्षात  ठेवा की पाणी प्यायल्यावर आपल्याला 45 मिनिटे काहीच खायचे नाही. 
 
2 दर रोज व्यायाम करावं- 
दररोज सकाळी उठून व्यायाम करावं. या चांगल्या सवयी मुळे निरोगी राहण्यास मदत मिळेल. दररोज 20 मिनिटे व्यायाम करावा. या मुळे आपल्याला दिवसभर ताजे तवाने वाटेल आणि ऊर्जा मिळेल.
 
3 न्याहारी -
सकाळी न्याहारीमध्ये मोड आलेले कडधान्य, हंगामी फळ आणि सुकेमेवे खावे.प्रयत्न करा की सकाळी 8 वाजे पर्यंत न्याहारी करून घ्यावी. आपण न्याहारीमध्ये फळांचा रस देखील घेऊ शकता.
 
4 जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये-
जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. या मुळे पचन शक्ती कमी होते आणि अन्न व्यवस्थितरीत्या पचत नाही. म्हणून जेवण्याच्या 45 मिनिटानंतर पाणी प्यावं. पाणी कोमट असेल तर जास्त योग्य.
 
5 लघवी करावी- 
जेवण्याच्या लगेच नंतर, अंघोळीच्या पूर्वी आणि झोपण्याच्या पूर्वी लघवी करावी. या मुळे मूतखडा होण्याची शक्यता कमी  होते. अंघोळीच्या पूर्वी लघवी केल्यानं शरीराचे तापमान सामान्य होत आणि झोपण्या पूर्वी केल्यानं रात्री झोप चांगली येते.    
 
6 साखरेचे प्रमाण कमी करा.
साखर शरीराला नुकसान देते म्हणून साखर आणि मीठ कमी प्रमाणात घ्यावे.
 
7 ध्यान करा.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी  ध्यान करा. या मुळे तणाव कमी होतो. किमान 15 मिनिटे ध्यान करावं.
 
8  पुरेशी झोप घ्या- 
पुरेशी झोप न झाल्यावर अस्वस्थता जाणवते. किमान 6 ते 8 तासाची झोप घ्यावी. हे शरीराला विश्रांती देते आणि शरीराला ऊर्जावान ठेवते. 
 
9 जेवण वेळेवर करा.
जेवण्याची वेळ ठराविक ठेवा. सकाळी 8 वाजता न्याहारी घ्या. दुपारी 12 च्या जवळ जेवण घ्या आणि सूर्यास्ताच्या पूर्वी जेवण करावं. रात्री झोपण्यापूर्वी दूध प्या. 
 
10 मॉलिश नियमानं करा- 
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दर आठवड्यात शरीराची मॉलिश करावी. ज्यामुळे रक्त परिसंचरण चांगले होते .या मुळे शरीराला काही विकार होत नाही.