Pineapple Juice प्यायल्याने कोणते फायदे होतात?
पायनापलमध्ये में व्हिटॅमिन A आणि C भरपूर प्रमाणात असतं. जाणून घ्या त्याचे 10 फायदे-
यात फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम आढळतात. हे सर्व घटक शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.
अननसमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात, जे शरीर स्वच्छ ठेवत पेशींचा क्षय रोखतात.
हे अँटिऑक्सिडंट संधिवात, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि अनेक प्रकारचे कर्करोग यासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात.
एक कप अननसाचा रस तुम्हाला 73% मॅग्नेशियम देतो, ज्यामुळे हाडे आणि ऊती मजबूत होतात.
हिरड्या आणि दात निरोगी ठेवण्यासाठी अननस खूप प्रभावी आहे. गाउटमध्येही हे फायदेशीर आहे.
अननसात व्हिटॅमिन ए आणि सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. डोळ्यांचे आरोग्यही चांगलं राहतं.
त्यात भरपूर पोटॅशियम असते तर सोडियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहाचा वेग नियंत्रित होतो.
याचा आहारात समावेश केल्याने पोटातील जंतांपासून मुक्ती मिळते.
अननस नखे निरोगी आणि सुंदर बनवतं. यामुळे त्वचा सुरकुत्या मुक्त होऊन सुंदर होते.
एक कप अननसात 82 कॅलरीज, 0 ग्रॅम फॅट, 0 ग्रॅम कोलेस्ट्रॉल, 2 मिलीग्राम सोडियम, 22 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 1 ग्रॅम प्रथिने असतात. हे जीवनसत्त्वांचे योग्य संयोजन आहे.
Edited by: Rupali Barve