गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

नपुंसकता दूर करण्यासाठी दररोज खावे फुटाणे

Roasted Chana आपण फुटाणे तर खाल्ले असतीलचं. जर आपण नियमित फुटाणे खात नसाल आतापासून दररोज खाणे सुरु करा. याचे आरोग्यासाठी खूप फायदे सांगितले गेले आहेत. फुटाणे योग्यरीत्या खाल्ल्याने मर्दानी शक्ती वाढते.
 
गरिबांचा बदाम म्हणून ओळखल्या जाणार्‍या फुटाण्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आर्द्रता, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. भाजलेले चणे फायदे जाणून घेतल्यानंतर हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे की एका निरोगी व्यक्तीने दररोज किती ग्रॅम फुटाणे खावे.
 
तर निरोगी व्यक्तीने दररोज 50 ग्रॅम फुटाणे खावे. हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
 
प्रतिकारशक्ती वाढते
जर तुम्ही दररोज 50 ग्रॅम भाजलेले फुटाणे नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणापूर्वी खाल्ले तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. रोगप्रतिकारशक्ती वाढवून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात शिवाय हवामान बदलत असताना अनेकदा उद्भवणाऱ्या शारीरिक समस्याही तुम्हाला त्रास देत नाहीत.
 
लठ्ठपणा कमी होतो
दररोज फुटाणे खाल्ल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होते. याने शरीरात अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते.
 
मूत्रमार्गाच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी
फुटाणे खाल्ल्याने लघवीशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळते. ज्यांना वारंवार लघवी येण्याची समस्या असते त्यांनी रोज गुळासोबत चणे खावे. तुम्हाला काही दिवसातच आराम जाणवेल.
 
बद्धकोष्ठतेत आराम
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांना रोज फुटाणे खाल्ल्याने खूप आराम मिळतो. बद्धकोष्ठता हे शरीरातील अनेक आजारांचे कारण आहे.
 
पोटाचे आजार दूर होतात
फुटण्यामध्ये त्रिफळा चूर्ण मिसळून थोडा वेळ भिजवून ठेवल्यानंतर एका कपड्यात बांधून अंकुरित करून सकाळी नाष्ट्यामध्ये खाल्ल्यास पोटाचे आजार दूर होतात.
 
नपुंसकता दूर करण्यासाठी उपाय
फुटाणे दुधासोबत खाल्ल्याने स्पर्मचा पातळपणा दूर होऊन वीर्य गुणवत्ता वाढते. फुटाणे पाण्यामध्ये भिजवून नंतर फुटाणे बाजूला काढून त्या पाण्यात मध मिसळून पिल्यास कमजोरी आणि नपुंसकतेची समस्या नाहीशी होते. फुटाणे मधासोबत खाल्ल्याने देखील नपुंसकता दूर होते. तसेच चीनी मातीच्या भांड्यात रात्री फुटाणे भिजवून सकाळी चावून खाल्ल्याने वीर्य वृद्धी होते. 10 ग्रॅम भिजवलेले फुटाणे आणि 10 ग्रॅम साखर मिसळून या मिश्रणाचे 40 दिवस सेवन केल्याने पुरुषांमधील कमजोरी दूर होते.