शांत झोप हवी आहे, मग हे करून बघा
निरोगी स्वास्थ्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आवश्यक आहे. पण त्याचबरोबर पुरेशी झोप घेणे देखील गरजेचे आहे. आजकाल शांत झोप मिळणे दुर्मिळ झाले आहे. लांबलेल्या कामाच्या वेळा, ताण, तणाव यामुळे नीट झोप लागत नाही. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. झोप न लागण्याची अनेक कारणे असतील पण त्यामुळे आरोग्यावर परिणाम होवून त्याचा समस्या उद्भवू लागतात. अपुऱ्या झोपेमुळे कामावर देखील परिणाम होतो.
अधिक चांगले काम करण्यासाठी शांत झोपेची गरज असते. कारण त्यामुळेच मन शांत, प्रसन्न राहतं व शरीराला ऊर्जा प्राप्त होते.
म्हणून शांत झोप येण्यासाठी हा घरगुती उपाय खूपच फायदेशीर ठरतो. हा उपाय अतिशय सोपा आहे. खसखस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तव्यावर थोडी भाजून घ्या. त्यानंतर खसखस ग्राईंड करून घ्या. मग कोमट दुधात जायफळ आणि खसखस पावडर घाला. नीट मिक्स करून दूध प्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच शांत झोप लागण्यास मदत होईल.