1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
  4. surprising benefits of eating soaked raisins on an empty stomach

रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या

मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात याचे सेवन अधिक केले जाते कारण ते प्रकृतीने गरम आहेत. तथापि आपण ते उन्हाळ्यात देखील खाऊ शकता. पण यासाठी मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्या. आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन कराव्यात. भिजवलेल्या मनुका खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आज आपण भिजवलेल्या मनुकाचे फायदे आणि जास्त खाण्याचे तोटे जाणून घ्या-
वजन कमी करण्यास उपयुक्त- रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यात आढळणारे ग्लुकोज आणि फ्रक्टोज घेतल्याने वजन नियंत्रणात राहते. रोज सकाळी मनुका खाल्ल्यास लठ्ठपणाचा बळी होण्यापासून वाचता येतं.
 
डोळ्यांसाठी फायदेशीर - भिजवलेल्या मनुका खाण्याने डोळ्यांची कमजोरी दूर होते. मुनकांमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे डोळ्यांच्या समस्या, मोतीबिंदू आणि कमी होत असलेल्या दृष्टीपासून मुक्ती मिळते. अशात मनुका नियमित खाल्ल्यास डोळे निरोगी राहू शकता.
केसांसाठी फायदेशीर- नियमितपणे भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने केस गळण्याची समस्या कमी होते. यामध्ये असलेले आयरन आणि व्हिटॅमिन सी केसांच्या चमक आणि मजबुतीसाठी काम करतात. त्यामुळे केस दाट होतात आणि कोंडा आणि टाळूशी संबंधित समस्या दूर होतात.
 
दातांची समस्या दूर होते- यात फायटोकेमिकल असल्याने सर्व प्रकारच्या दातांची समस्या दूर होते. सकाळी रिकाम्या पोटी मनुका खाल्ल्याने तोंडातील बॅक्टेरिया देखील नष्ट होतात.
बद्धकोष्ठतेपासून सुटका- यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मनुका पोटातील पाणी शोषून घेतात ज्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यात फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असल्याने पचनसंस्था मजबूत होते. याशिवाय गॅसची समस्या आणि मूत्रमार्गात अडथळे येण्याची समस्याही दूर होते.
 
 
अस्वीकरण: वेबदुनियावर आरोग्य, सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेद, योग, धर्म, ज्योतिष, वास्तु, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी विषयांवर प्रकाशित/प्रसारित केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ जनहित लक्षात घेऊन आपल्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया या बाबींच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. यापैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. 
Edited By - Priya Dixit 
 
 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा