शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (18:33 IST)

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. देशातील दुसर्‍या लाटेत अनेकांचे अकाली मृत्यू झाले आहेत. दुसर्‍या लाटेदरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा परिस्थिती बर्‍यापैकी वाईट दिसत आहे . ऑक्सिजन, औषधे, बेड नसल्यामुळे बर्‍याच लोकांना उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांनी आपले  प्राण गमावले. तथापि, कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर सरकारने देखील सर्वत्र  हळूहळू सैलपणा करून सर्वकाही सुरू केल. तसेच लोक देखील मास्क न वापरता  आणि सामाजिक अंतर न राखता मोकळे फिरत होते. 
 
कोरोनाच्या प्रथम लाटेत संपूर्ण देशात कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन केले गेले.लॉकडाऊनमध्ये लोक मुळीच बाहेर पडले नाहीत. पण दुसऱ्या लाटेत पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. लोक अजून देखील कोविड नियमांचे पालन करीत नाहीत, अनावश्यकपणे बाहेर पडत आहेत. आणि परिणामी पुन्हा एकदा लॉकडाउन लावले आहे. 
 
दुसर्‍या लाटेमध्येही राज्यांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार लॉकडाउन लावण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत, पण वारंवार लॉकडाऊननंतर आता या 10 गोष्टी लक्षात ठेवा -
 
* सरकारकडून वारंवार लॉकडाउन लावले जात आहे म्हणजे कोरोनाचा वेग कमी झालेला नाही. म्हणूनच, आवश्यकता असल्यावरच घरातून बाहेर पडा.
 
* गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. घरातील केवळ एकाच सदस्याने घरातून बाहेर पडावे. 
 
* डबल मास्क लावून जावे, सामाजिक अंतर राखावे.सॅनिटायझर आपल्या जवळ बाळगा. 
 
* कोणाच्याही गळाभेट घेऊ नका.हात मिळवणी करू नका. दुरूनच नमस्ते करा.
 
* बाहेरून घरी आल्यानंतर, कुठेही स्पर्श करू नका परंतु प्रथम 30 सेकंद आपले हात साबणाने धुवा.
 
* बाहेरून आल्यानंतर आंघोळ करा आणि डेटॉल ने आपले कपडे धुवा.
 
* फळे आणि भाज्या दोन वेळा पाण्याने धुवा. आपण प्रथम मीठ पाण्याने धुवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.
 
* लॉकडाउन संपल्यानंतरही स्वच्छतेची काळजी घ्या. बाहेर कोणत्याही गोष्टींना स्पर्श करू नका. सॅनिटायझर वापरत रहा.
 
* वारंवार आपला चेहरा आणि नाकाला स्पर्श करु नका.मास्क ला  कधीही तोंडावरून धरु नका. आपण ते दोन्ही बाजूंनी धरून वर करा.
 
* कोरोनाचा धोका वाढला आहे. म्हणून आधी सर्जिकल मास्क लावा नंतर कापडी मास्क लावा.
  
* घरात काम करण्याऱ्या बाईला देखील नेहमी मास्क लावायला सांगा नेहमी प्रमाणे तिचे हात देखील ती आल्यावर सेनेटाईझ करावे.