सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (17:35 IST)

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा

लॉकडाउन टप्पा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. गरजेनुसार सर्वत्र लॉकडाउन लावले जात आहेत, जेणेकरून या साथीचा त्रास टाळता येईल. सध्याच्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत शेकडो लोक मरत आहेत. म्हणूनच, लॉकडाऊन बरोबर स्टे होम, स्टे सेफ असा संदेश देण्यात येत आहे. परंतु या वेळी खबरदारी घेणे फार महत्वाचे आहे. कारण या आजाराच्या चपळ्यात कोण, कधी आणि कसे येणार आहे, हे कोणालाही समजू शकलेले नाही. म्हणून, घरी राहताना खबरदारी घ्या.चला तर मग जाणून घेऊ या की स्टे होम, स्टे सेफ मध्ये कशा प्रकारे सुरक्षित राहता येईल. 
 
* आपण भाज्या, फळे किंवा इतर वस्तू ऑर्डर केल्यास त्यांना थेट हातात घेऊ नका. डिलिव्हरी बॉयला ते बाजूला ठेवायला सांगा  आणि सेनेटाईझ केल्या नंतरच त्याचा वापर करा.
 
* शिंक किंवा खोकला आल्यावर आपले हात स्वच्छ धुवून घ्या. कोरोनाची लक्षणे आढळल्यावर डॉक्टरांशी चर्चा करून स्वत: ला वेगळे ठेवणे आवश्यक आहे आणि कोविडची  तपासणी करुन घ्या.
 
* घरात प्रत्येकाशी अंतर राखून बोला .शक्यतो आपली कोणतीही वस्तू शेयर करू नये. एक मेकांचा मास्क अजिबातच लावू नये. 
 
* एखादे महत्त्वाचे कार्य असल्यावरच घराच्या बाहेर पडा, कारण आपण घरात सुरक्षित आहात.
 
* घरी असताना दिवसातून एकदाच काढा घ्या, केवळ आरोग्यदायी गोष्टी खा.घरातील वृद्ध लोकांची विशेष काळजी घ्या. त्यांना वेळेवर फळ देत रहा, दिवसातून एकदा तरी नारळ पाण्याचे सेवन करा.