1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

भारतातील 89 टक्के कर्मचारी करतात तणावाखाली काम

tension in work place
अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, ब्राझील, इंडोनेशिया या देशांतील कर्मचार्‍यांपेक्षा भारतातील 89 टक्के कर्मचारी तणावग्रस्त असल्याचा एक अहवाल समोर आला असून हे सर्वेक्षण सिग्राने समोर आणले आहे. सिग्रा 360च्या सर्वेक्षण अहवालात 89 टक्के भारतीय कर्मचारी तणावग्रस्त असल्याचे सांगितले आहे. कामाच्या ठिकाणी असलेला दबाव आणि आर्थिक चणचण अशी दोन प्रमुख कारणे भारतात तणावाखाली असण्याची आहेत. 
 
भारतातील 89 टक्के कर्मचारी या दोन कारणांमुळे तणावाखाली काम करतात असेही या सर्वेक्षणात समोर आले आहे. भारतातील कर्मचारी जगाच्या तुलनेत जास्त तणावात काम करतात. त्याचबरोबर आपले भविष्यात कसे होणार? हा प्रश्र्नही भारतीयांना मोठ्या प्रमाणावर सतावतो. आपले आरोग्य कसे चांगले राहील? माझे कुटुंब कसे सुखात राहील? मी माझी पत सामाजिक स्तरावर कशी सांभाळेन? काम आणि पैसा यांचे नियोजन कसे करेन? या प्रश्र्नांनी भारतीयांना भंडावून सोडलेले असते. 
 
त्याचबरोबर या अहवालात भारतातील 18 ते 34 या वयोगटातील वर्ग सर्वाधिक तणावाखाली असतो असेही नमूद केले आहे. 95 टक्क्यांपर्यंत 18 ते 34 या वयोगटात तणावाचे प्रमाण असते असेही स्पष्ट आहे. सिग्राने हा अहवाल तयार करण्यासाठी 14 हजारांपेक्षा जास्त ऑनलाइन मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमध्ये 23 देशांमधील लोक सहभागी होते. ज्या भारतीयांनी या मुलाखतींमध्ये सहभाग घेतला होता त्यापैकी 75 टक्के लोकांनी आपण तणावाखाली का असतो याची विविध कारणे दिली. काहींनी बोलण्यास नकार दिला.