गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑक्टोबर 2024 (22:30 IST)

या 5 वस्तूंचे सेवन करा कॅन्सरला दूर पळवा

cancer
ब्रोकोली- ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्‍सीडंट असतात. फायबर, फ्लॅओनोईड्‌सचे प्रमाण देखील यामध्ये अधिक असते. हे पेशीचा नाश होऊ नये म्हणून मदत करते. अँटीऑक्‍सीडंट हे कर्करोगाच्या पेशींची वाढ होऊ नये म्हणून मदत करते.
 
द्राक्षे – अँटीऑक्‍सीडंटचा द्राक्ष हे खूप मोठे स्रोत आहे. द्राक्ष हे कॅन्सरवर खूपच प्रभावी आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी ते मदत करते.
 
हिरव्या पालेभाज्या- रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. अँटीऑक्‍सीडंट बीटा कॅरोटीन आणि ल्यूटीन हे कर्करोगच्या पेशींची वाढ कमी करण्यास मदत करतात. कोशिंबिरचा देखील रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे.
 
बेरीस- ब्लू बेरीस, ब्लॅक बेरीस आणि स्ट्रॉबेरीस या अँटीऑक्‍सीडंट एक मोठा स्रोत आहे. यामधून कर्करोगाला लांब ठेवणारे अँटीऑक्‍सीडंट मोठ्या प्रमाणात मिळते.
 
किवी – किवीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी, अँटीऑक्‍सीडंट, व्हिटामिन ई, मोठ्या प्रमाणात असते. याचे नियमित सेवन केल्याने कॅन्सरला दूर करू शकतो.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit