रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2024 (11:33 IST)

मुलांना उन्हाळयात पाठवत आहात शाळेत, करू नका या चुका

family
Parenting Mistakes: उन्हाळ्याची सुट्टी संपताच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी करायला लागतात. पण या दरम्यान काही सामान्य चुका होतात. ज्या मुलांचे आरोग्य आणि अभ्यासावर परिणाम करतात. मुलांना शाळेत पाठवतांना काही सामान्य चुका होतात. या चुका होऊ नये म्हणून काय उपाय करावे तर चला जाणून घेऊ या. 
 
1. मुलांना योग्य प्रमाणात पाणी न पाजणे- 
उन्हाळ्यात डिहाइड्रेशन एक सामान्य समस्या आहे, खासकरून लहान मुलांमध्ये. शाळेत जातांना मुलांनी योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे म्हणजे ते डिहाइड्रेट होणार नाही. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत जातांना पाण्याची बाटली द्यायला हवी. तसेच त्यांना थोडया थोडया वेळाने पाणी प्यावे म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे. 

2. मुलांना लाईट रंगाचे कपडे न घालणे- 
उन्हाळयात डार्क रंगाचे कपडे घालू नये, ज्यामुळे मुलांना घाम येऊ शकतो. पालकांनी आपल्या मुलांना लाईट रंगाचे आणि मोकळे कपडे घालावे. ज्यामुळे हवा शरीराला लागले आणि त्यांना थंड वाटेल. 
 
3. मुलांना सनस्क्रीम न लावणे- 
सनस्क्रीन त्वचेला सूर्याच्या नुकसानदायक किरणांपासून वाचवते. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत जातांना सनस्क्रीम लावावे. कडक ऊन नसले तरी लावावे. सनस्क्रीन कमीत कमी एसपीएफ 30 हवी आणि दोन तासांनी नियमित लावावी. 
 
4. मुलांना टोपी न घालणे- 
टोपी आणि छत्री सूर्याच्या किरणांपासून मुलांचे रक्षण करण्यास मदत करते. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत जातांना टोपी घालणे गरजेचे. जर जास्त वेळ उन्हात राहत असतील तर छत्री आणि टोपी अवश्य द्यावी 
 
5. मुलांना आरामदायी शूज न घालणे-
उन्हाळ्यात मुले नेहमी चप्पल, सॅंडल घालतात ज्या आरामदायी नसतात. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत जातांना शूज घालावे. जे मुलांच्या पायाला सुरक्षा प्रदान करतील व दुखापत होणार नाही. 
 
6. मुलांना पौष्टिक जेवण न देणे- 
उन्हाळ्यात मुलांना पौष्टिक जेवणाची गरज असते जे मुलांना आरोग्यदायी ठेवेल. पालकांनी आपल्या मुलांना लाँच बॉक्समध्ये पौष्टिक जेवण द्यावे, जसे की फळे, भाजी पोळी, सलाड इत्यादी जेवण द्यावे. 
 
7. मुलांना योग्य झोप घेऊ न देणे- 
उन्हाळ्यात मुले नेहमी उशिरापर्यंत जगतात आणि सकाळी उशिरा उठतात पालकांनी आपल्या मुलांना चांगली झोप घेण्यासाठी प्रोत्साहित करावे तसेच झोपेची वेळ ठरवून द्यावी. 
 
8. मुलांना जास्त वेळ स्क्रीन पाहू देणे- 
उन्हाळ्यात मुले नेहमी टीव्ही, व्हिडीओ गेम आणि सोशल मीडिया वर अधिक वेळ घालवतात. पालकांनी आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम सीमित ठेवावा. त्यांना इतर कामात लावावे जसे की वाचन, लिखाणकाम आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करणे. 
 
9. मुलांच्या गतिविधीची योजना न बनवणे- 
उन्हाळ्याच्या सुट्या लहान मुलांसाठी नवीन गोष्टी शिकणे आणि नवीन गतिविधींचा  अनुभव करण्यासाठी एक चांगला वेळ असतो. पालकांनी आपल्या मुलांसाठी नवीन गोष्टी कराव्या जसे की शिबीर, खेळ आणि कार्यक्रमची योजना बनवावी म्हणजे ते व्यस्त आणि आनंदी राहतील. 
 
10. मुलांची सुरक्षा न पाहणे- 
उन्हाळ्यात मुले नेहमी जास्त वेळ बाहेर व्यतीत करतात. याकरिता त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असते. पालकांनी आपल्या मुलांना अनोळखी व्यक्तीशी बोलू नये तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये सांगावे. 
 
उन्हाळ्यात लहान मुलांना शाळेत पाठवतांना या सामान्य चुकांपासून वाचून, पालकांनी आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षा आणि शिक्षणाला निश्चित करावे. सावधानी आणि योजना ठरवून लहान मुले उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकतात. तसेच नवीन काहीतरी शिकू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik