शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 6 एप्रिल 2024 (09:01 IST)

दररोज 10 हजार पावले चाला, या 10 गंभीर आजारांपासून वाचा

प्रत्येकाला नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असते. आजही व्यायामाच्या नवीन पद्धती आणि शैलींमध्ये चालण्याचे महत्त्व आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी चालणे हा नेहमीच सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, दररोज 10,000 पावले चालल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. साधारणपणे हे फिटनेससाठी हेल्दी टार्गेट मानले जाते. सामान्यतः लोक वजन कमी करण्यासाठी चालणे करतात, परंतु दिवसातून 10,000 पावले चालण्याचे इतर अनेक फायदे आहेत. तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम करते.
 
1. वेट लॉस
वजन कमी करण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. दररोज 10,000 पावले चालल्याने तुम्ही 300 ते 400 कॅलरीज बर्न करू शकता. यामुळे तुमची फॅट बर्न होईल आणि तुमची एनर्जी लेव्हलही वाढेल.
 
2. हेल्दी हार्ट
नियमित रूपाने चालल्याने हृदय रोग, स्ट्रोक आणि ब्लड प्रेशर याचा धोका कमी होतो. वॉकिंग केल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन चांगलं राहतं ज्यामुळे हार्ट योग्यरीत्या कार्य करतं. याने हृद्य निरोगी राहण्यास मदत होते.
 
3. मजबूत स्नायू
चालण्याने तुमचे स्नायू मजबूत होतात. जेव्हा तुम्ही नियमितपणे चालता तेव्हा तुमचे स्नायू टोन होतात, त्यांची ताकद वाढते आणि ते सहज कार्य करण्यास सक्षम होतात. दिवसातून 10,000 पावले चालल्याने तुम्ही मस्क्यूकोस्केलेटल समस्यांचा धोका कमी करू शकता.
 
4. मजबूत हाडे
तुमच्या शरीराचा सर्व भार हाडांवर पडतो. त्यामुळे हळूहळू ते कमजोर होऊ लागतात. तुम्ही नियमित चालता तेव्हा तुमची हाडे सक्रिय राहतात. याशिवाय सांध्यांचे स्नेहनही राहते. हाडांची घनता वाढते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि हाडे फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.
 
5. एनर्जी
वॉकिंग तुमची एनर्जी लेव्हल वाढवण्याचे काम करते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे तुमच्या मेंदू आणि स्नायूंना जास्त ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळतात. यामुळे तुम्हाला ऊर्जा जाणवेल.
 
6. कंट्रोल ब्लड शुगर
मधुमेहाचा धोका कमी करायचा असेल तर नियमित चालावे. यामुळे इंसुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे तुमच्या शरीराला रक्तातून ग्लुकोज पेशींमध्ये हलवण्यास मदत होते. अशा परिस्थितीत रक्तातील साखर आपोआप नियंत्रित होते.
 
7. मेंटल हेल्थ
वॉकिंगने शरीरात एंडोर्फिन नावाचे न्यूरोट्रांसमीटर तयार होतात, जे तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटण्यास मदत करतात. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो. नियमित चालण्याने नैराश्याचा धोकाही कमी होतो.
 
8. निद्रानाश दूर होईल
वॉकिंगने तुमची सर्केडियन लय सुधारते. यामुळे तुमच्या शरीरात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते. दररोज 10,000 पावले चालल्याने तुम्ही तणावमुक्त झोपू शकता.
 
9. इम्यूनिटी बूस्ट
वॉकिंगने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे तुमचे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे पांढऱ्या रक्त पेशी देखील वाढतात, ज्यामुळे संसर्ग कमी होतो. चालण्यामुळे तुमच्या शरीरातील अँटिऑक्सिडंट्सची पातळी वाढते, जी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
 
10. श्वसन प्रणाली सुधारते
जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता, ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसाची क्षमता वाढते. यामुळे तुम्ही जास्त ऑक्सिजन घेऊ शकता आणि जास्त कार्बन डायऑक्साइड सोडू शकता. त्यामुळे तुमची श्वसनसंस्था मजबूत होते.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजुतीवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.