गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 6 एप्रिल 2024 (17:55 IST)

उसाचा रस या लोकांनी करू नये सेवन, जाणून घ्या सावधानी

उसाचा रस मधुमेह असलेल्या लोकांनी सेवन करू नये. जे लोक वजन कमी करू इच्छित असतील त्यांनी उसाचा रस सेवन करू नये. तसेच ज्यांना दातांची समस्या आहे त्यांनी देखील उसाचा रस सेवन करू नये. 
उसाचा रस हे गोड आणि थंड पेय आहे, जो जगप्रिय आहे. प्रत्येकाला उसाचा रस सेवन करायला आवडतो. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज आणि अँटीऑक्सीडेन्ट भरपूर प्रमाणात असते. जो आरोग्यासाठी चांगला पर्याय आहे. पण सामान्यतः काही लोकांनी उसाचा रस सेवन करू नये, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर चला जाणून घेऊ या कोणी उसाचा रस सेवन करू नये . 
1. मधुमेह रूग्ण
मधुमेह असलेल्या लोकांनी उसाचा रस सेवन करू नये. कारण उसाच्या रसामध्ये नैसर्गिकरित्या ग्लुकोजचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. जो रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतो. मधुमेह असलेल्या लोकांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. यामुळे या लोकांनी उसाचा रस सेवन करू नये. 
 
2. हाइपोग्लाइसीमिया रुग्ण 
हाइपोग्लाइसीमिया ही एक अशी स्थिती आहे. ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी होते. उसाचा रस सेवन केल्यास या लोकांच्या रक्तातील कमी होऊ शकतो. ज्यामुळे चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. 
 
3. वजन कमी करणारे लोक 
उसाचा रस कॅलरीने भरपूर असतो. एका उसाच्या रसाच्या ग्लासमध्ये कमीतकमी 250 कॅलरी असतात. ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी कॅलरीचे प्रमाण कमी ठेवावे. याकरिता उसाचा रस या लोकांनी सेवन करू नये. 
 
4. दातांची समस्या असणारे लोक 
उसाचा रस अम्लीय असतो. जो दातांच्या इनेमला समस्या निर्माण करू शकतो. ज्या लोकांना दातांमध्ये कॅव्हिटी आहे किंवा दांत संवेदनशील असतील तर, अश्या लोकांनी उसाचा रस सेवन करणे टाळावे. 
 
5. मूत्रपिंडचा आजार असणारे लोक 
मूत्रपिंडचा आजार असणाऱ्या लोकांना पोटॅशियमचे सेवन मर्यादेत करणे गरजेचे असते. म्हणून ज्यांना मूत्रपिंडाचे आजार आहे अश्या लोकांनी उसाचा रस सेवन करू नये. 
 
6. एलर्जी असणारे लोक 
काही लोकांना उसाची एलर्जी असते. या एलर्जीमध्ये पित्त, सुजणे, खाज येणे, श्वास घ्यायला त्रास होणे ह्या समस्या असतात. जर तुम्हाला उसाची एलर्जी असेल तर उसाचा रस सेवन करू नये. 
 
7. गर्भवती आणि स्तनपान करण्याऱ्या महिला 
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी उसाचा रस सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उसाचा रस औषधांसोबत परस्पर क्रिया करू शकतो. तसेच गर्भावस्था आणि स्तनपान दरम्यान उसाचा रस सेवन करणे सुरक्षित आहे की नाही यावर थोड्या प्रमाणातच माहिती उपलब्ध आहे. 
 
इतर सावधानी 
उसाचा रस सेवन करण्यापूर्वी आवश्य ऊस धुऊन घ्यावा. हे जाणून घ्या की यामध्ये काही कीटकनाशक किंवा इतर रसायन तर नाही. उसाचा रस सेवन केल्यानंतर आपले तोंड स्वच्छ धुवून घ्यावे. उसाचा रस हा आरोग्यदायी आहे पण काही लोकांनी हा रस सेवन करणे टाळावे. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik