शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (00:04 IST)

रात्री का नाही खायला पाहिजे आंबट पदार्थ, जाणून घ्या काय आहे त्याचे धोके

should you not have sour foods
जेव्हा गोष्ट रात्री खायची असते, तेव्हा सर्वजण रात्री हलका खाण्याचा सल्ला देतात. पण याबद्दल कोणाला योग्य माहिती नसते की रात्री काय खायला पाहिजे आणि काय नाही. रात्रीच्या जेवणाबद्दल बरेच भ्रम असतात पण यातून काहीतर फक्त निराधार असतात तर काहींच्या मागे तर्क लपलेले असतात. जसे की रात्री आंबट पदार्थांचे सेवन नाही करायला पाहिजे. यातील सर्वात मोठे कारण असे की आंबट फळांची प्रकृती अम्‍लीय असते. रात्री झोपण्याअगोदर आंबट फळ खाल्ल्याने ऍसिडिटी होऊ शकते. असे मानले जाते की रात्री आंबट पदार्थ खाल्ल्याने खोकला आणि थंडीची समस्या वाढते.
 
वेटलॉसमध्ये अडचण : बर्‍याच विशेषज्ञांचे मानणे आहे की रात्री आंबट पदार्थ खाल्ल्याने रिटेंशनची समस्या येऊ शकते जी तुमच्या वेटलॉसमध्ये अडचण आणू शकते. रात्री काकडी, रसम, दही आणि रायते नाही खायला पाहिजे.
 
वात दोषाची समस्या : वात दोष असल्याने सर्दी आणि खोकला वाढू शकतो आणि नाकाच्या मार्गाने बलगमचे निर्माण होऊ शकतो. यामुळे थकवा देखील येतो.
रात्री झोपण्यात येऊ शकते समस्या : रात्री आंबट पदार्थांचे सेवन केल्याने पोटात आम्लाची मात्रा वाढू लागते जी शरीरासाठी योग्य पोषक तत्त्वांना अवशोषित नाही होऊ देत. जर तुम्हाला देखील आंबट पदार्थ खाण्याची सवय असेल तर आजपासून या सवयीला बदलून द्या. तसे तर स्वास्थ्य विशेषज्ञांचे म्हणणे आहे की रात्री झोपण्याअगोदर  कुठल्याही प्रकारचे खाद्य पदार्थ नाही खायला पाहिजे. कारण या दरम्यान शरीरातून निघणारी ऊर्जेमुळे तुम्हाला रात्री झोपताना बेचैनी होऊ शकते.