गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

भुट्टा: स्वादिष्ट आणि फायदेशीर

पाऊस पडला की भाजलेल्या भुट्ट्याचा सुवासाने तोंडाला पाणी सुटतं. लिंबू आणि मीठ लावून याचा स्वाद अजून वाढतो. भुट्टा स्वादिष्ट तर असतो पण याचे काही ‍फायदेही आहेत:
 
* मुलांना भुट्टा खाऊ घातल्याने त्यांचे दात मजबूत होतात.
 
* भुट्टा खाल्ल्यावर त्याचे दोन तुकडे करून वास घेण्याने सर्दी बरी होते.

* दाणे काढलेला भुट्टा वाळवून मग त्याला जाळून त्याची राख तयार करू शकता. ही राख रोज कोमट पाण्याबरोबर घेतल्याने खोकला बरा होतो. डांग्या खोकल्यावरही हे चूर्ण उपयोगी ठरेल.
 
आयुर्वेदाप्रमाणे भुट्टा तृप्त करणारे, कफ आणि पित्तनाशक धान्य आहे. शिजवलेला भुट्टा जास्त पोषक असतो.