रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

हिंगाचे पाणी किती फायदेशीर, जाणून घ्या

जेवण्यात स्वाद आणि सुवासासाठी हिंग वापरण्यात येतं आणि हे पचनासाठी फायद्याचे आहे. तसेच हिंगाचे एकच नव्हे तर अनेक फायदे आहेत, जाणून घ्या 5 विशेष फायदे:
बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास हिंग फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी हिंगाचे चूर्ण पाण्यात मिसळून पिऊन घ्या. सकाळी पोट अगदी स्वच्छ होऊन जाईल.
 
भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंग तुपात भाजून आलं आणि लोणीसोबत सेवन करावे. याने भूक लागू लागेल.

त्वचेत काटा, काच किंवा एखादी टोकदार वस्तू टोचल्यास त्या जागी हिंगाचे पाणी किंवा लेप लावावे. आत टोचलेली वस्तू आपोआप बाहेर पडेल.
 
कानात वेदना होत असल्यास तेलात हिंग गरम करून, त्या तेलाचं एक-एक थेंब कानात टाकल्याने वेदना दूर होतील.
 
दातांमध्ये कॅविटी झाल्यास हिंग फायद्याचे ठरेल. दाता किड लागली असल्या रात्री दाताला हिंग लावून किंवा दाबून झोपावे. कीड आपोआप दूर होईल.