बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

व्यसन सोडायचे घरगुती उपाय!

drinks
व्यसन हे दारूचे असो, सिगारेट अथवा तंबाखूचे, त्याचा आपल्या शरीरासह मनावर विपरीत प‍रीणाम झाल्याशिवाय राहत नाही. नशा केल्याने आपले गुण नष्ट होतातच तर आत्मा आणि शरीर या दोघांनाही हळू- हळू नष्ट होत असतात. दारू हे 'स्लो पॉयझन' असे जरी आपण गंमतीने म्हणत असलो तरी ते खरे आहे.

पहिल्यादा दारू पिणार्‍यापैकी 15 ते 25 टक्के लोक व्यसनी होत असतात. ही फार वाईट सवय आहे. आजच्या आधुनिक जीनवात दारूने सहजरित्या प्रवेश केला आहे. आज स्त्री, पुरुष, युवावर्ग, वृध्द या सगळयांना ती प्रिय असते मात्र दारु कोणावर प्रेम करत नाही. या गोड विषाला सोडण्याच भलाई आहे, नाही तर तुमच्याकडे पश्चाताप करण्यासाठी ही वेळ शिल्लक राहणार नाही. दारु, सिगारेट व तंबाखू सोडण्‍याचे सहज व सोपे उपाय आम्ही आपल्यासाठी देत आहोत. ते पुढील प्रमाणे...

1. सफरचंदाचा रस वेळोवेळी पिल्याने तसेच जेवनात सेफचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय सुटते.
2. उकडलेले सफरचंद दिवसातून तीन- चारदा सेवन केल्याने दारूची सवय सुटते.
3. एका हळदीचे बारीक-बारीक तुकडे करावे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्‍याची इच्छा झाली तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून आराम चघळावे. काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते.
4. सिगारेट सोडण्यासाठी दालचीनीला बारीक वाटून शहदामध्ये टाकून जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा झाला तेव्हा मिश्रण बोटाने चाखावे.
5. कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्‍याची सवय सुटते.
6. चरस, गांजा, दारू यांची कोणालाही जास्त नशा झाली असल्यास 60 ग्रॅम अंगुर वाटून पाण्यासोबत गाळून घ्यावे. यामध्ये कालीमिर्च, जीरे यांची पूड व मीठ टाकून पिण्यास द्यावे. लवकरच दारूची झिंग उतरते.
7. एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावा. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूची नशा कमी होते.